-
सूरज भाटिया दिग्दर्शित ‘हम साथ साथ है'(Hum Saath-Saath Hai) हा चित्रपट १९९९ ला प्रदर्शित झाला होता. (फोटो सौजन्य: महेश ठाकूर इन्स्टाग्राम)
-
सलमान खान, तब्बू, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे,करिश्मा कपूर, मोहनशी बाहल, नीलम कोठारी(Neelam Kothari), अलोक नाथ, महेश ठाकूर(Mahesh Thakur), रीमा लागू, सदाशिव अमरापूर असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात होते. प्रेक्षकांना हा सिनेमा प्रचंड आवडल्याचे पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य: महेश ठाकूर इन्स्टाग्राम)
-
प्रेक्षकांना हा सिनेमा प्रचंड आवडल्याचे पाहायला मिळाले. आता महेश ठाकूर यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नीलम कोठारी त्यांच्यावर चिडल्याची आठवण सांगितली आहे. (फोटो सौजन्य: महेश ठाकूर इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटात महेश ठाकूर आणि नीलम कोठारी यांनी विवाहित जोडप्याची भूमिका निभावली होती. (फोटो सौजन्य: महेश ठाकूर इन्स्टाग्राम)
-
महेश ठाकूर यांनी नुकतीच ‘रेडिओ नशा ऑफिशियल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला. (फोटो सौजन्य: महेश ठाकूर इन्स्टाग्राम)
-
त्यांनी म्हटले, “आम्ही ए बी सी डी या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात केली. बसमध्ये त्या गाण्याच्या डान्स स्टेप्स करताना मला अवघडल्यासारखं वाटत नव्हतं.” (फोटो सौजन्य: नीलम कोठारी इन्स्टाग्राम)
-
“आम्हाला डान्स करायचा होता आणि बससुद्धा रस्त्यानुसार हलत होती. या सगळ्यात माझी एक डान्स स्टेप चुकली आणि मी नीलमच्या अंगावर पडलो.” (फोटो सौजन्य: नीलम कोठारी इन्स्टाग्राम)
-
तिने मला म्हटले, “तू काय करतोयस?” त्या क्षणानंतर सलमान, सैफ व तब्बू असे सगळे तिची रॅगिंग करू लागले. (फोटो सौजन्य: नीलम कोठारी इन्स्टाग्राम)
-
ते तिला म्हणू लागले, “जर तो तुझ्या प्रेमात पडला, तर तो असा पडणार नाही”, त्यांच्या अशा विनोदामुळे वातावरणातील ताण हलका झाला. (फोटो सौजन्य: नीलम कोठारी इन्स्टाग्राम)
-
नीलमने माझ्याबद्दल मनात कोणताही राग धरला नाही. (फोटो सौजन्य: नीलम कोठारी इन्स्टाग्राम)
-
त्या विनोदामुळे आमच्यातील तणाव कमी झाला. (फोटो सौजन्य: सलमान खान इन्स्टाग्राम)
-
नीलम कोठारी नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’या कार्यक्रमात दिसून आली. (फोटो सौजन्य: नीलम कोठारी इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही