-
सध्या रेश्मा शिंदेच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
-
छोट्या पडद्यावरची ही लाडकी अभिनेत्री आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
नुकताच तिचा हळदी समारंभ पार पडला.
-
रेश्माचा होणारा नवरा कोण आहे याची चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती, अखेर हळदी समारंभाच्या फोटोंमधून त्याचं नाव समोर आलं आहे.
-
रेश्माचं पहिलं केळवण पार पडल्यावर नेटकऱ्यांसह अभिनेत्रीचे चाहते तिला होणाऱ्या नवऱ्याबद्दल विचारत होते. पण, अभिनेत्रीने एवढे दिवस तिच्या होणाऱ्या पतीची ओळख कुठेही उघड केलेली नव्हती.
-
अखेर हळदीचे फोटो शेअर करत रेश्माने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला त्यात टॅग केलं आहे.
-
रेश्माच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव पवन असं आहे.
-
हळदी समारंभाला या दोघांनीही Twinning केल्याचं पाहायला मिळालं.
-
मराठी कलाकारांनी या फोटोंवर कमेंट्सचा व रेश्माच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा भरभरून वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम, talesontime, madhurikhese makeupartist, a9ragphotography )

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य