-
पॉर्नोग्राफी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी २९ नोव्हेंबरला सकाळी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या घरावर छापा टाकला. पोर्नोग्राफी प्रकरणी हा छापा टाकण्यात आला, ज्यामध्ये कुंद्रावर अश्लील फिल्म बनवण्याचा आणि मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारे वितरित केल्याचा आरोप होता. (Photo Source: @theshilpashetty)
-
कुंद्रा यांना जून २०२१ मध्ये अटकही करण्यात आली होती आणि ते दोन महिने तुरुंगात होते. सप्टेंबर २०२१ पासून ते जामिनावर बाहेर आहेत. (Photo Source: @theshilpashetty)
-
या प्रकरणात कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीने या बेकायदेशीर व्यवसायातून केवळ प्रचंड पैसा कमावला नाही, तर देशाच्या कायद्याचेही उल्लंघन केल्याचा पोलिसांचा दावा आहे. तथापि, ईडीच्या छाप्यांचे हे प्रकरण पहिल्यांदाच घडले असे नाही. यापुर्वीही बॉलीवूड सेलिब्रिटींना ईडीने रडारवर ठेवले आहे. चला जाणून घेऊया त्या बॉलीवूड स्टार्सबद्दल ज्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकले आहेत. (Photo Source: @theshilpashetty)
-
नोरा फतेही
सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने नोरा फतेहीला समन्स पाठवले होते. तिच्यावर मोठ्या खंडणी रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. यावरील तपासासाठी नोरा फतेहीला दोन वेळा बोलवण्यात आले होते. (Photo Source: @norafatehi) -
रणबीर कपूर
महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणात ईडीने रणबीर कपूरला समन्स पाठवले होते. त्याच्यावर या ॲपची प्रसिद्धी आणि प्रचार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्याच्या लग्नाचा खर्च आणि सेलिब्रिटी कनेक्शनचीही चौकशी करण्यात आली. (Photo Source: @aliaabhatt) -
जॅकलिन फर्नांडिस
सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला ईडीने समन्स बजावले होते. ईडी याप्रकरणी म्हणाली की तिने पुरावे लपविण्याचा प्रयत्न केला, तर जॅकलीनने हे आरोप फेटाळून लावले होते, ती स्वतःला याप्रकरणी पीडित म्हणाली होती आणि ईडीवर पक्षपाती असल्याचा आरोपही केला होता. (Photo Source: @jacquelienefernandez) -
ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या राय बच्चनला २००४ मधील पनामा पेपर्स प्रकरणात ईडीने समन्स बजावले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांच्या विदेशी व्यवहारांची चौकशी करण्यात आली. (Photo Source: @aishwaryaraibachchan_arb) -
रकुल प्रीत सिंग
तेलुगु फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग्ज प्रकरणी रकुल प्रीत सिंगला ईडीने समन्स बजावले होते. एनसीबीने यापूर्वी या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह इतर सेलिब्रिटींचीही चौकशी केली होती, ज्यामध्ये रकुलचे नाव आले होते. हे प्रकरण उच्चस्तरीय ड्रग्ज रॅकेटशी संबंधित होते.(Photo Source: @rakulpreet) -
यामी गौतम
यामी गौतमला फेमा (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट) चे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने समन्स बजावले होते. तिच्यावर दीड कोटी रुपयांचा खुलासा न केल्याचा आरोप होता. कोरोना महामारीच्या काळात हे समन्स आले होते त्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे होत गेले होते. (Photo Source: @yamigautam) -
रिया चक्रवर्ती
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी ईडीने रिया चक्रवर्तीला पुन्हा वारंवार समन्स बजावले होते. रियाने या प्रकरणात सहकार्य केले नसल्याचा आरोप ईडीने केला होता, तिच्या आर्थिक व्यवहारांवर संशय व्यक्त केला जात होता. तिच्या मालमत्ता आणि संबंधित कंपन्यांची चौकशी करण्यात आली होती. (Photo Source: @rhea_chakraborty)
हेही पाहा- Maharashtra Assembly Election Results: यंदा विधानसभेत पोहचले ‘हे’ तरुण आमदार, ५ ज्येष्ठ आमदारांबद्दलही जाणून घ्या

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी