-
‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘भाभीजी घर पर हैं!’ या टीव्ही मालिकांमधून प्रसिद्ध झालेली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे आज ४० वर्षांची झाली आहे. अभिनेत्रीचा आज ४० वा वाढदिवस आहे. या वाढदिवशी तिच्या करिअरमधील संघर्ष, लग्न आणि पतीची अब्जावधींची संपत्ती याबद्दल जाणून घेऊयात.
-
नेहा पेंडसेने अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे, परंतु ती ‘आय कम इन मॅडम’ आणि ‘भाभीजी घर पर हैं!’ या मालिकांमुळे प्रसिद्ध आहे. बालकलाकार म्हणून तिने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिला इंडस्ट्रीत २९ वर्षे झाली आहेत. मात्र, तिचा संबंध प्रवास सोपा नव्हता. तिच्या नातेवाईकांनी तिला खूप नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, तर अभिनेत्रीला अनेक वेळा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. करोडपती बिझनेसमनची तिसरी पत्नी बनल्यावरही तिच्यावर बरीच टीका करण्यात आली.
-
नेहा पेंडसेने १९९५ मध्ये एकता कपूरच्या ‘कॅप्टन हाउस’ या टीव्ही शोमधून बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी ती फक्त १० वर्षांची होती. यानंतर नेहाने ‘हसरतें’ आणि ‘पडोसन’ सारख्या मालिकांमध्ये काम केले.
-
नेहाने १९९९ मध्ये ‘दाग: द फायर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे आणि ती एके काळी दक्षिण चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेत्री होती.
-
मात्र, या प्रवासात नेहा पेंडसेला अनेकदा कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले. याबाबत नेहा पेंडसेने एकदा ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. नेहाने सांगितले होते की ती इंडस्ट्रीत नवीन होती. तिला कोणताही गॉडफादर नव्हता. यामुळे तिला अनेकदा कास्टिंग काउचचा सामना करावा लागला.
-
नेहा पेंडसे जेव्हा ‘मे आय कम इन मॅडम’च्या प्रमोशनसाठी लखनऊला गेली होती, तेव्हा तिने सांगितले होते की, तिला अनेकदा कामाच्या बदल्यात वाईट ऑफर्स आल्या, तिने त्या नाकारल्या. नेहा म्हणाली होती की, इंडस्ट्रीत तुम्हाला गॉडफादर असणे खूप गरजेचे आहे.
-
नेहा पेंडसेने वयाच्या १० व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली, पण त्यासाठी तिला खूप काही सहन करावे लागले. नेहाने सांगितले होते की, तिच्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रात नाही. अशा स्थितीत नातेवाईक तिला खूप टोमणे मारायचे, शिवीगाळ करायचे. पण आज तेच नातेवाईक तिची स्तुतीही करतात.
-
नेहा पेंडसेला केवळ करिअरमुळेच टोमणे खावे लागले नाहीत तर लग्नामुळेही अनेक टोमणे खावे लागले. नेहाने २०२० मध्ये बिझनेसमन शार्दुल सिंह ब्याससोबत लग्न केले. नेहाशी लग्न करण्यापूर्वी शार्दुलचा दोनदा घटस्फोट झाला होता. नेहा त्यांची तिसरी पत्नी आहे. या कारणामुळे नेटकऱ्यांनी नेहाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
-
नेहा पेंडसेचा नवरा पती शार्दुल हा व्यवसायाने व्यावसायिक असून तो २२ कंपन्यांचा मालक आहे. माध्यमांतील माहितीनुसार त्याची एकूण संपत्ती १२५ दशलक्ष डॉलर एवढी आहे. (१०,५५८ कोटी रुपये) (Photos Source: Nehha Pendse Instagram)
हेही पाहा- Photos : साऊथमधील अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहिलात का? मालविकाच्या हॉटनेसवर चाहते घायाळ

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”