-
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
नागराज मंजुळे यांना समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा समता पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमातील हे फोटो आहेत.
-
हा पुरस्कार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
-
यावेळी त्यांना एक लाख रुपये रोख, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
-
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार पंकज भुजबळ, हेमंत रासणे, माजी खासदार समीर भुजबळ आणि इतर ओबीसी संघटनांचे पदाधिकारी सहकारी उपस्थित होते.
-
त्याचवेळी नागराज यांच्या पत्नी आणि कुटुंबीयही यावेळी आवर्जून हजर होते.
-
नागराज यांनी यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी स्केच केलेल्या महात्मा फुलेंच्या फोटोचा उल्लेख केला. तो फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
“अकरावी बारावीत असताना मी जोतिबा फुलेंचं रेखाचित्र काढलं होतं. त्यांच्या विचारांचं बोट पकडून प्रवास नुकताच सुरू केला होता. आज त्यांच्याच नावानं पुरस्कार मिळवा ही अत्यंत आनंदाची आणि सार्थकतेची गोष्ट आहे. कृतज्ञ.” असे कॅप्शन नागराज यांनी या फोटोंना दिले आहे. दरम्यान हा कार्यक्रम काल २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीदिनी पुण्यातील फुले वाड्यामध्ये पार पडला.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”