-
Pushpa 2: द रुल नंतर रश्मिका मंदान्ना ही भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे अशी अफवा आहे. मात्र, या अटकळांना पूर्णविराम देत अभिनेत्रीनेच यामागचे सत्य सांगितले आहे.
-
Pushpa 2: द रुलच्या प्रमोशन शिवाय, रश्मिका मंदान्ना इंटरनॅशनल फिल्म फस्टिव्हल ऑफ इंडिया या सोहळ्यात देखील सहभागी झाली होती.
-
या इव्हेंटमध्ये मीडियाने तिला सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असल्याबद्दल विचारले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, “मी याच्याशी अजिबात सहमत नाही, हे चुकीचे वृत्त आहे.”
-
दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाला या चित्रपटासाठी १० कोटी रुपये मिळाले आहेत, जे तिच्या पहिल्या भागाच्या मानधनापेक्षा खूप जास्त आहेत.
-
पहिल्या भागासाठी रश्मिकाला २ कोटी रुपये मिळाले होते.
-
रश्मिका मंदान्नाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कन्नड चित्रपट करिका पार्टीमधून केली होती.
-
हा चित्रपट २०१६ मध्ये आला होता. तिच्या पहिल्याच चित्रपटातून अभिनेत्रीला बरीच मोठी ओळख मिळाली.
-
पुष्पा २ हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे.
-
अल्लू अर्जुनच्या या सिक्वेल चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे.
(सर्व फोटो साभार- रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम)
हेही पाहा- ‘या’ सेलिब्रिटींसाठी २०२४ हे वर्ष कठीण होते, घटस्फोट किंवा ब्रेकअप करून संपवले प्रेमाचे नाते
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा