-
ऐश्वर्या राय बच्चनने २०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘पोनियान सेल्वन १’ आणि २०२३ मध्ये रिलीज झालेल्या त्याचा सिक्वेलसह उत्कृष्ट पुनरागमन केले आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सिमा पुरस्कार मिळाला होता.
-
ऐश्वर्याने बॉलिवूडसोबतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही खूप काम केले आहे. पण खूप कमी लोकांना माहित आहे की ऐश्वर्याने २ हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
-
ऐश्वर्याची इच्छा असती तर ती आणखी अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करू शकली असती. पण तिने हॉलिवूड चित्रपटांच्या अनेक ऑफर नाकारल्या. तिने या ऑफर्स नाकारल्या नसत्या तर जगातील टॉप अभिनेत्रींमध्ये तिची गणना झाली असती. बरं, ऐश्वर्याचे हे दोन चित्रपट कोणते आहेत आणि यानंतर तिने हॉलिवूडचे चित्रपट का केले नाहीत? याबद्दल जाणून घेऊ.
-
ऐश्वर्या रायने १९९७ साली इरुवर या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याच वर्षी तिने ‘और प्यार हो गया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. २००९ मध्ये रिलीज झालेल्या हम दिल दे चुके सनमने ती रातोरात स्टार बनली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
-
२००३ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जेव्हा ‘देवदास’ प्रदर्शित झाला तेव्हा तिच्या अभिनयाची जगाला ओळख झाली. अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर आल्या, त्यापैकी एक ब्रॅड पिटचा ‘मि. आणि मिसेस स्मिथ’. ऐश्वर्याने नकार दिल्यानंतर अँजेलिना जोलीने हा चित्रपट केला. हा २००५ चा सर्वाधिक कमाई करणारा अमेरिकन चित्रपट होता. -
२००९ नंतर ऐश्वर्या हॉलिवूड चित्रपटांपासून दूर राहिली. मात्र, त्याचे नेमके कारण समजू शकले नाही. लग्नापूर्वी तिने ४ इंग्रजी चित्रपट केले होते. अनेकांनी याचे कारण तिच्या अभिषेक बच्चनसोबतच्या लग्न हे सांगितले. ऐश्वर्याने २००७ मध्ये लग्न केले आणि आराध्याचा जन्म २०११ मध्ये झाला.
-
२००४ मध्ये आलेल्या इंग्रजी रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘ब्राइड अँड प्रिज्युडिस’मध्ये ऐश्वर्या रायने मुख्य भूमिका साकारली होती. पुढच्या वर्षी तिने ‘द मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस’मध्ये काम केले. हा चित्रपट त्याच नावाच्या १९९७ च्या कादंबरीवर आधारित होता.
-
ऐश्वर्या राय बच्चनने २००६ मध्ये ब्रिटीश बायोग्राफिकल फिल्म ‘प्रोवक्ड’ मध्येही काम केले होते. याशिवाय तिने कॉलिन फर्थ आणि बेन किंग्सले यांच्यासोबत ‘द लास्ट लीजन’ या ऐतिहासिक ॲक्शन फिल्ममध्ये काम केले. एप्रिल २००७ मध्ये अबू धाबीमध्ये त्याचा प्रीमियर झाला होता.
-
ऐश्वर्या राय बच्चनचा शेवटचा हॉलिवूड चित्रपट ‘द पिंक पँथर २’ होता. हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक कॉमेडी थ्रिलर चित्रपट होता, ज्यामध्ये ऐश्वर्याने भ्रष्ट गुन्हेगार सोनिया सोलांड्रेसची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने हॉलिवूड चित्रपटात काम केले नाही.
(सर्व फोटो साभार- सोशल मीडिया)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?