-
रेश्मा शिंदेच्या लग्नसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
-
अभिनेत्रीने लग्नात खास दाक्षिणात्य लूक केला होता.
-
केळवण, मेहंदी, हळद असे सगळे लग्नाआधीचे विधी पार पडल्यावर रेश्मा आणि पवन यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.
-
अभिनेत्रीने लग्न लागताना सोनेरी रंगाची साडी नेसली होती. यावर लाल रंगाचा डिझायनर ब्लाऊज, केसात गजरा, हातात हिरवा चुडा, गळ्यात भरजरी दागिने असा लूक रेश्माने केला होता.
-
तसेच रेश्माच्या नवऱ्याने लग्नात ऑफ व्हाइट रंगाचा सदरा घातला होता.
-
या सगळ्यात रेश्माच्या गळ्यातील मंगळसूत्राने सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं.
-
रेश्माच्या पारंपरिक दाक्षिणात्य मंगळसूत्राची चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
हे सुंदर मंगळसूत्र सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे.
-
रेश्मा आणि पवन यांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील असंख्य कलाकारांनी उपस्थिती लावली होती. ( फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम, a9ragphotography, madhurikhese makeupartist )

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!