-
प्रसिद्ध अभिनेता ‘किरण गायकवाड’ याने सोशल मीडियावर जोडीने काही खास फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. किरण गायकवाडची होणारी अर्धांगिनी म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली.
-
सध्या सन मराठी वाहिनीवरील ‘तिकळी’ या मालिकेत ती मुख्य भूमिकेचं काम करताना दिसत आहे.
-
किरण गायकवाड ‘देव माणूस’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून लोकप्रिय झाला.
-
लग्न मोडल्यानंतर किरण डिप्रेशनमध्ये गेल्याचे एका मुलाखतीत त्याने सांगितले. हे नातं सोशल मीडियावर कबूल करत ह्या मोहक जोडप्याने काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटोशूट निसर्गाच्या कुशीत एका मोकळ्या रानात झाले आहे.
-
या फोटोमध्ये वैष्णवीने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे. या साडीला फुलांची सजावट असून सोनेरी किनार आणि बाजूला फुलांची प्रिंट आहे.
-
तसेच किरणने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. या कुर्त्यावर निळ्या आणि राखाडी रंगाच्या पानांची प्रिंट आहे.
-
हे गोड नातं सोशल मीडियावर शेअर करत किरणने कॅप्शनमध्ये “तू काही संगीतकार नाहीस आणि गायकपण नाहीस, पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलं आहे” असे लिहिले आहे.
-
त्याचबरोबर आजकाल चालणाऱ्या राजकीय घडामोडींना टोमणा देत किरण असेही म्हणाला आहे, “मंत्रिमंडळातल्या बैठका होत राहतील, मंत्री पद वाटत राहतील, त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर !”
(सर्व फोटो सौजन्य : किरण गायकवाड / इंस्टाग्राम)