-
तुम्ही प्राइम व्हिडिओवर पंचायतचे सर्व सीझन पाहू शकता. या हलक्याफुलक्या सिरीजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिरिजचा तिसरा सीझन या वर्षी आला आहे. प्रेक्षक आता या सिरिजच्या चौथ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध असलेल्या पाताल लोक या सिरिजची कथा दिल्लीशी जोडलेली आहे तशीच ती उत्तर प्रदेशशीही जोडलेली आहे.
-
प्राइम व्हिडिओच्या या सिरीजचा पहिला सीझन सुपरहिट ठरला होता.
-
त्यात जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत होता. आता त्याच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे.
-
ॲक्शन क्राईम थ्रिलरने भरलेल्या मिर्झापूर वेब सिरीजचे तीन सीझन रिलीज करण्यात आले आहेत. ते तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. या सिरिजला ८.४ रेटिंग मिळाले आहे. प्रेक्षक पुढच्या भागाची वाट पाहत आहेत.
-
राज आणि डीकेच्या द फॅमिली मॅन सिरीजचे दोन्ही सीझन हिट ठरले. त्याचा तिसरा सीझन या वर्षी येण्याची अपेक्षा होती पण आता तो पुढच्या वर्षी येत आहे.
-
एमएक्स प्लेअरवरची आश्रम ही सिरीज बॉबी देओलच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. या सिरीजच्या चौथ्या सीझनची प्रेक्षक वाट पाहत आहेत.
-
सीझन ३ सोबत चौथा भागही जाहीर झाला होता. मात्र प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. या लोकप्रिय सीरिजचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे.
-
दिल्ली क्राईम ही सिरीज या वर्षी रिलीज होऊ शकते. पहिल्या दोन सीझनप्रमाणे यावेळीही डीसीपी वर्तिका म्हणजेच शेफाली शाह दिल्ली क्राईम-३ मधील गुन्ह्यांची उकल करताना दिसणार आहे. (सर्व फोटो – सोशल मीडिया)
हेही पाहा- Photos : गायिका ध्वनी भानुशालीचा पांढऱ्या आऊटफिटमधील हॉट लूक, फोटो व्हायरल
![Rape in Faridabad](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Rape-2.jpg?w=300&h=200&crop=1)
क्रूरतेचा कळस! कंडक्टरने बसच्या खिडक्या लावल्या अन् चालकाने महिलेवर केला लैंगिक अत्याचार; कुठे घडली धक्कादायक घटना!