-
सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर आता या मालिकेतील अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेत यशची बायको आरोहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच खऱ्या आयुष्यात लग्न करणार आहे.
-
कौमुदी वलोकरचं केळवण नुकतंच पार पडलं. यानंतर अभिनेत्रीने तिची बॅचलर पार्टी साजरी केली आहे.
-
कौमुदी व तिचा होणारा नवरा आकाश चौकसे या दोघांनी एकत्र त्यांची बॅचलर पार्टी साजरी केली.
-
कौमुदीने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
कौमुदीने बॅचरल पार्टीला सुंदर असा मजंठा रंगाचा गाऊन घातल्याचं पाहायला मिळालं.
-
कौमुदी आणि आकाश यांच्या बॅचलर पार्टीसाठी सुंदर अशी सजावट करण्यात आली होती.
-
दरम्यान, अभिनेत्रीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ( फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

Shashi Tharoor : बिलावल भुट्टोंना शशी थरुर यांचं जोरदार प्रत्युत्तर; “सिंधु नदीत रक्ताचे पाट वाहिले तर तुमच्या रक्ताचं….”