-
२०२४ मध्ये ‘स्त्री २’ आणि ‘मुंज्या’ सारख्या हॉरर चित्रपटांनी भारतात खूप खळबळ उडवली. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात भयानक हॉरर चित्रपट कोणता आहे? (Photo: Prime Video)
-
हॉलीवूडबद्दल बोलायचे झाले तर आजही लोक द कॉन्ज्युरिंग, ॲनाबेले आणि टेक्सास चेनसॉ मॅसेकर सारखे हॉरर चित्रपट पाहून घाबरतात. पण एक हॉलिवूड चित्रपट आहे जो संपूर्ण जगातील सर्वात भयानक हॉरर चित्रपट असल्याचे म्हटले जाते. गुगलनेही याला सर्वात वाईट हॉरर फिल्म म्हणून टॅग दिला आहे. (Photo: The Exorcist/FB)
-
वास्तविक, हा दुसरा तिसरा कोणी नसून १९७३ मध्ये रिलीज झालेला ‘द एक्सॉर्सिस्ट’ चित्रपट आहे, जो आतापर्यंतचा सर्वात भयानक चित्रपट आहे. एवढच नाही या चित्रपटावर अनेक देशांमध्ये बंदी आहे. (Photo: The Exorcist/FB)
-
‘द एक्सॉर्सिस्ट’ चित्रपटाला IMDb वर ८.२ रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट विल्यम पीटर ब्लॅटी यांच्या कादंबरीवर आधारित आहे. ‘द एक्सॉर्सिस्ट’वर इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंडचा समावेश असलेल्या जगातील तीन देशांमध्ये बंदी आहे. हा चित्रपट गेल्या ५० वर्षांतील सर्वात भयानक हॉरर चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. (Photo: The Exorcist/FB)
-
सुरुवातीला हा चित्रपट केवळ २५ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. खरं तर, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी निर्मात्यांना अपेक्षा नव्हती, म्हणूनच तो इतक्या कमी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. (Photo: The Exorcist/FB)
-
‘द एक्सॉर्सिस्ट’ची स्क्रिप्ट स्वतः विल्यम पीटरने लिहिली होती आणि हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचेही बोलले जाते. जेव्हा हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यानंतर तो अमेरिकेशिवाय इतर अनेक देशांमध्ये प्रदर्शित झाला. (Photo: The Exorcist/FB)
-
चित्रपटात एकापेक्षा एक भयानक दृश्य आहेत. याचा अंदाज यावरून लावता येतो की हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा बरेच प्रेक्षक इतके घाबरले होते आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला होता. चित्रपटगृहात लोकांनी उलट्याही केल्या होत्या. (Photo: The Exorcist/FB)
-
‘द एक्सरसाइजर’ने अनेक पुरस्कार पटकावले, ज्यात सर्वात मोठ्या ऑस्कर पुरस्कारांपैकी एक आहे. ऑस्कर जिंकणारा हा पहिला हॉरर चित्रपट होता. सध्या हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. (Photo: The Exorcist/FB)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”