-
‘तुझं माझं जमेना’, ‘लगोरी’ या मालिकांतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री म्हणजे दीप्ती लेले होय.
-
‘ती फुलराणी’,’आम्ही दोघे राजा राणी’, ‘सांग तू आहेस का?’ या मालिकांमध्ये काम करत दीप्तीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता मात्र तिने सांगितलेला किस्सा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
-
अभिनेत्री दीप्ती लेलेने नुकताच लोकशाही फ्रेंडली मराठीबरोबर संवाद साधला.
-
त्यावेळी तिला विचारण्यात आले की, तू चाहत्याला मी दीप्ती लेले नाही असं म्हटलं होतंस?
-
त्यावर बोलताना अभिनेत्रीने सांगितले, “हो,मी हे एकदा नाही बऱ्याचदा केलं आहे. दोन-तीन कारणं असतात.”
-
“कधी कधी मी इतक्या भयंकर अवतारात असते, मला लाज वाटते सांगायला की हो मी ती आहे. कधी कधी मी खूप घाईत असते.”
-
“कधी कधी मला पुढच्या प्रश्नांचा कंटाळा आलेला असतो, प्रश्न टाळण्यासाठी मी आधीच सांगते की नाही, नाही मी ती नाहीच.”
-
अभिनेत्रीने अशा एका प्रसंगाचा किस्सा सांगताना म्हटले, “मी ट्रेनमध्ये बसले होते. शेजारची मुलगी माझ्याकडे सतत बघत होती. मग तिने गूगल केलं आणि तिची खात्री पटली.”
-
“तेव्हा माझी ‘लगोरी’ ही मालिका सुरू होती. मग तिने मला विचारलं की, ‘लगोरी’मधली ऋजुता ना? तुम्हाला भेटून छान वाटलं, असं ती म्हणाली.”
-
“मी म्हटलं मी नाहीये ती, कारण मला बोलायचा खूप कंटाळा आला होता. खूप दमले होते. मग स्टेशन आलं आणि मी निघाले, दारात जाऊन उभी राहिले. तर तेव्हा मी एक अंगठी घालायचे. माझ्या हातात रूबी असायचा कायम. त्यावरून तिने ओळखलं.”
-
ती म्हटली की, नाही नाही मला माहितेय की तुम्हीच आहात त्या. मी ती अंगठी ओळखते. मी स्टेशनवर उतरून निघून गेले. मी मागे वळून पाहिलंच नाही, मला फार ओशाळल्यासारखं झालं होतं.”
-
अभिनेत्री नुकतीच दीप्ती ‘दि ए आय धर्मा स्टोरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. (सर्व फोटो सौजन्य: दीप्ती लेले इन्स्टाग्राम)
स्वारगेट बलात्कार प्रकरण : बस स्थानकातील सीसीटीव्हींबाबत महत्त्वाची माहिती, कॅमेऱ्यांचा रोख प्रवाशांऐवजी…