-
मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच विवाहबंधनात अडकली. तिच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
आता अभिनेत्रीने नुकतेच तिच्या सासरच्या गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
रेश्मा शिंदेच्या सासरच्या घराची संपूर्ण झलक यामध्ये पाहायला मिळत आहे.
-
लाडक्या सुनेच्या स्वागतासाठी पवनच्या घरच्यांनी खास तयारी केली होती.
-
पवनच्या घरच्यांनी संपूर्ण घरात फुलांची सजावट करून बंगल्याला बाहेरून विद्युत रोषणाई केल्याचं रेश्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
पवनच्या आईने यावेळी लाडक्या सुनेचं औक्षण केलं आणि त्यानंतर माप ओलांडून रेश्माने गृहप्रवेश केला.
-
“गृहप्रवेश… पवनने माझा हात अगदी घट्ट पकडला होता” असं कॅप्शन अभिनेत्रीने या पोस्टला दिलं आहे.
-
रेश्माच्या गृहप्रवेशाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
याशिवाय प्रतीक्षा मुणगेकर, विशाखा सुभेदार यांनी या पोस्टवर कमेंट करत रेश्माला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/ praj_291 इन्स्टाग्राम )

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…