-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी १ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी प्रियांकाने तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास हिला एक खास सरप्राईज दिले. (Photo Source: @priyankachopra/instagram)
-
डिस्नेने आयोजित केलेल्या ‘मोआना २’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला प्रियंका मालतीला घेऊन गेली. हा सपूर्ण दिवस तिने केवळ आपल्या कुटुंबासोबतच नाही तर आपल्या मित्रांसोबतही साजरा केला. (Photo Source: @priyankachopra/instagram)
-
या खास क्षणाचे फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये मालती तिच्या लहान मित्रांसोबत चित्रपटाचा आनंद लुटताना दिसत आहे. (Photo Source: @priyankachopra/instagram)
-
प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “What a special treat on our anniversary. Maltis favorite Moana, with our friends and family. Moana 2 is so much fun!! Thank you disney disneyanimation for the amazing screening. all the kids had the best time. In theaters now.” (Photo Source: @priyankachopra/instagram)
-
२०१६ च्या ‘मोआना’ चा सिक्वेल असलेला डिस्नेचा हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२४ रोजी थँक्सगिव्हिंगच्या निमित्ताने प्रदर्शित होत आहे. (Photo Source: @priyankachopra/instagram)
-
या चित्रपटाने पहिल्या पाच दिवसात २२१ मिलियन डॉलर कमावले. चित्रपटाला भारतीय बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त प्रतिसादही मिळाला. २९ नोव्हेंबरला भारतात रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत १३.१७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Photo Source: @priyankachopra/instagram)
-
त्यांच्या Anniversary ला आणखी खास बनवण्यासाठी, प्रियांका आणि निकने यावेळी पिझ्झा, चॉकलेट्स आणि खूप मजा करून साजरा केला. हा दिवस तिच्यासाठी एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नसल्याचे प्रियांकाने सांगितले. (Photo Source: @priyankachopra/instagram)
-
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा खूपच स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. तिने तपकिरी रंगाचा स्कर्ट आणि स्लीव्हलेस टॉप घातला आहे. (Photo Source: @priyankachopra/instagram)
-
दरमयान, सध्या प्रियांका तिच्या ‘सिटाडेल २’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तिचा आगामी ‘द ब्लफ’ हा चित्रपटही चर्चेत आहे. प्रियांका तिचे काम आणि कुटुंब या दोन्ही गोष्टींचा समतोल उत्तम प्रकारे सांभाळत आहे. (Photo Source: @priyankachopra/instagram)
हेही वाचा- मागील ५० वर्षांतील सर्वात भयानक हॉररपट; चित्रपट पाहून प्रेक्षकांना सिनेमागृहातच झाल्या उलट्या, या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”