-
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आजवर सईने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
-
लवकरच सईचा ‘अग्नि’ नावाचा नवा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ६ डिसेंबरला सईचा ‘अग्नि’ चित्रपट अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
-
‘अग्नि’ चित्रपटात अभिनेता प्रतिक गांधी, दिव्येंदु शर्मा, सैयामी खेर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
-
तसंच नुकतंच ‘सोनी मराठी’वर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक!’ हे नवं पर्व सुरू झालं आहे. या नव्या पर्वात पुन्हा एकदा परीक्षक म्हणून सई पाहायला मिळणार आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या नव्या पर्वानिमित्ताने सई ताम्हणकरशी खास संवाद साधण्यात आला. यावेळी सईला समीर चौघुलेंचं तीन शब्दांत वर्णन करायला सांगितलं.
-
सई समीर चौघुलेंचं तीन शब्दांत वर्णन करत म्हणाली, “नितळं, नैसर्गिक, जगात भारी.”
-
त्यानंतर तिला सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्याविषयी तीन शब्दांत सांग, असं सईला सांगितलं.
-
तेव्हा सई म्हणाली, “सिल्व्हर हेडेड प्रिन्स विथ सुपीक जमीन.”
-
फोटो सौजन्य – सई ताम्हणकर इन्स्टाग्राम

RCB vs GT: विराटला गोलंदाजी करता करता थांबला सिराज, दोघेही झाले भावुक; गिलच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल