-
दिग्दर्शक सुकुमार यांचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २०२१ च्या तेलुगू ब्लॉकबस्टरचा सिक्वेल आहे आणि प्रेक्षक तो पाहण्यास उत्सुक आहेत. (फोटो-इन्स्टा/अल्लू अर्जुन)
-
हा चित्रपट ५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे आणि त्याची तिकिटे ९५ रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यंत सुरू आहेत. (फोटो-इन्स्टा/अल्लू अर्जुन)
-
हा चित्रपट एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे, ज्यात तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या भाषांचा समावेश आहे. (फोटो-इन्स्टा/अल्लू अर्जुन)
-
चित्रपटाचा रन टाईमही चर्चेचा विषय बनला आहे. हिंदीमध्ये या चित्रपटाचा कालावधी ३ तास, २० मिनिटे ३८ सेकंद आहे, जो रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ (फोटो-इन्स्टा/अल्लू अर्जुन) पेक्षा जास्त आहे.
-
चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच अमेरिकेत विक्रम मोडले आहेत, जिथे चित्रपटाने १८ कोटी रुपये कमावले आहेत. (फोटो-इन्स्टा/अल्लू अर्जुन)
-
चित्रपटाने भारतात आगाऊ बुकिंगमध्ये ८० कोटी रुपये जमा केले आहेत आणि रिलीज होण्यापूर्वीच चित्रपट १०० कोटींचा टप्पा ओलांडू शकतो. (फोटो-इन्स्टा/अल्लू अर्जुन)
-
यापूर्वी असे म्हटले जात होते की हा चित्रपट 3D मध्ये देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो, परंतु आता सध्या हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित होत नाहीय, यासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागेल. (फोटो-इन्स्टा/अल्लू अर्जुन)
-
दिल्ली आणि नोएडामध्ये या चित्रपटाचे मॉर्निंग शो आहेत, जे सकाळी ६.२० वाजता सुरू होत आहेत आणि शेवटचा शो रात्री ११ वाजता असेल. (फोटो-इन्स्टा/अल्लू अर्जुन)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य