-
इंटरनेट मूव्ही डेटाबेस (IMDb) ने अलीकडेच 2024 मधील सर्वात लोकप्रिय भारतीय स्टार्सची यादी जाहीर केली आहे. या वार्षिक यादीने अनेकांना धक्का दिला आहे कारण शाहरुख खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, प्रभास यांना मागे टाकून ॲनिमल फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी पहिल्या क्रमांकावर पोहेचली आहे. पाहूया संपूर्ण यादी.
-
#1: तृप्ती दिमरी 2024 च्या IMDb च्या सर्वाधिक लोकप्रिय स्टार्सच्या यादीत प्रथम स्थानावर आहे. तिच्याकडे या वर्षी भूल भुलैया 3 आणि बॅड न्यूज सारखे चित्रपट होते.
-
#2: बी-टाउनची नवीन आई दीपिका पदुकोण दुसऱ्या क्रमांकावर आहे. ती या वर्षी फायटर चित्रपटात दिसली होती आणि पती रणवीर सिंगसोबत तिच्या पहिल्या बाळाचे स्वागत केल्यामुळे ती देखील चर्चेत होती.
-
#3: इशान खट्टर यावर्षी नेटफ्लिक्स शो द परफेक्ट कपलमध्ये दिसला होता.
-
#4: शाहरुख खान चौथ्या क्रमांकावर गेला आहे.
-
#5: सोभिता धुलिपाला, नवीन वधू, पाचव्या क्रमांकावर आहे. नागा चैतन्यसोबतच्या लग्नामुळे तीही चर्चेत राहिली.
-
#6: महाराज आणि मुंज्यासारख्या लोकप्रिय सिनेमांमध्ये दिसलेल्या शर्वरीला सहावे स्थान मिळाले.
-
#7: ऐश्वर्या राय बच्चनचा या वर्षी एकही चित्रपट रिलीज झाला नाही तरीही ती तिच्या असंख्य सार्वजनिक लूक्समुळे चर्चेत आहे. तसेच, तिच्या आणि तिचा अभिनेता पती अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवांनीही अनेक बातम्यांमुळे चर्चेत राहिली.
-
#8: समंथा रुथ प्रभूला आठवा क्रमांक मिळाला. तिने वरुण धवन सोबत प्राइम व्हिडीओवरील वेब सिरीज सिटाडेल: हनी बनी मध्ये काम केले आणि यंदा तिच्या वैयक्तिक आयुष्याकडे देखील तिच्या चाहत्यांचं खूप लक्ष होतं
-
#9: आलिया भट्ट 9व्या स्थानावर होती. तिचा जिगरा हा चित्रपट चाहत्यांना प्रभावित करण्यात अयशस्वी झाला असला तरी, अभिनेता-पती रणबीर कपूर आणि मुलगी राहा कपूरसोबतचे तिचे वैयक्तिक आयुष्य तिच्या चाहत्यांना नेहमीच आकर्षित करते.
-
#10: तेलगू स्टार प्रभासने 10 व्या स्थानावर आहे. या वर्षी तो बिग बजेट हिट कल्की 2898 एडीमध्ये दिसला होता.
हेही पाहा- Photos : पांढऱ्या वन पिसमध्ये अवनीत कौरचा बोल्ड अंदाज, फोटो व्हायरल
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”