-
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर Pushpa 2: The Rule हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी रिलीज झाला. रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत आहे. 2021 च्या ब्लॉकबस्टर Pushpa: The Rise च्या सिक्वेलने यापूर्वीच्या मोडलेल्या 11 रेकॉर्ड्सवर एक नजर टाकुयात.
-
जगभरातील सर्वात मोठी ओपनिंग: अल्लू अर्जुन-स्टारर पुष्पा 2 – द रुलने एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर (रु. 223 कोटी) च्या विक्रमाला मागे टाकत जगभरातील बॉक्स ऑफिसवर भारतीय चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग मिळवली आहे. पुष्पा 2 ने जगभरात अंदाजे 282.91 कोटी रुपये कमावले आहेत.
-
‘भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग’: अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने 133 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या RRRला मागे टाकून 165 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह जगभरातील सर्वात मोठ्या ओपनिंग डेची नोंद केली आहे.
-
हिंदी Box Office येथे पुष्पा 2 ला दक्षिण चित्रपटातील सर्वात मोठी ओपनिंग: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटाला हिंदी बॉक्स ऑफिसवर दक्षिण भारतीय चित्रपटासाठी सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आहे. पुष्पा 2 ने हिंदीत 67 कोटींची कमाई केली आहे.
-
पुष्पा 2 हा 200 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट’: अल्लू अर्जुन-स्टारर हा भारतीय बॉक्स ऑफिसवर रु. 200 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई करणारा पहिला चित्रपट आहे.
-
पुष्पा 2 ने एका दिवसात 50 कोटी रुपये कमवले: अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर हा एकाच दिवसात दोन भाषांमध्ये (तेलुगु आणि हिंदी) 50 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे.
-
पुष्पा 2 ने परदेशात ‘सर्वात मोठी ओपनिंग’ नोंदवली: 2024 मध्ये एका भारतीय चित्रपटासाठी सर्वात मोठी विदेशी ओपनिंग पुष्पा 2 ने केली आहे, याआधीच्या प्रभासच्या कल्की 2898 एडीने केलल्या रेकॉर्डला तोडले.
-
अल्लू अर्जुनसाठी पुष्पा 2 सर्वात जास्त कमाई करणारा: चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन हे अल्लू अर्जुनचे आतापर्यंतचे सर्वात मोठे देशांतर्गत, परदेशातील आणि जगभरातील कलेक्शन आहे.
-
दिग्दर्शक सुकुमारसाठी पुष्पा 2 सर्वात मोठी कमाई करणारा: दिग्दर्शक सुकुमारसाठीही या चित्रपटाने देशांतर्गत, परदेशात आणि जागतिक स्तरावर सर्वात मोठी कमाई केली आहे.
-
पुष्पा 2: रश्मिकाच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा हिट: पुष्पा 2 मधील रश्मिका मंदानाच्या भूमिकेला खूप प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने रश्मिकासाठी देशांतर्गत, परदेशी आणि जगभरातील सर्वात मोठी ओपनिंग केली आहे.
-
पुष्पा 2: निर्मात्यांसाठीही मोठा ठरला: पुष्पा 2 ची निर्मिती Mythri Movie Makers ने केली आहे. निर्मात्यांसाठी सर्वात मोठी देशांतर्गत, परदेशी आणि जगभरातील मोठी ओपनिंग म्हणून कामगिरी केली आहे.
-
पुष्पा 2 ‘हिंदीतील आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग’ आहे: अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी शाहरुख खानच्या जवानला मागे टाकले. एकट्या पुष्पा 2 च्या हिंदी आवृत्तीने 72 कोटी रुपये कमावले आणि शाहरुख खानच्या जवानला मागे टाकले, जवानचे पहिल्या दिवशी 65 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन होते.
हेही पाहा- Pushpa 2: अल्लू अर्जुनपेक्षा जास्त भाव खावून गेला खलनायक भंवर सिंग; कोण आहे हा अभिनेता? त्याची पत्नी, शिक्षण आणि संपत्तीबद्दल जाणून घ्या

विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?