-
Ranveer Allahbadia Nikki Sharma: प्रसिद्ध YouTuber रणवीर अल्लाबदियाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तो YouTube वर ‘BeerBiceps’, ‘रणवीर अलाहाबादिया’ आणि इतर अनेक नावांनी स्वतःचे YouTube चॅनेल चालवतो, ज्यावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. सध्या YouTuber त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत आहे. (फोटो क्रेडिट: रणवीर अल्लाबदिया/इन्स्टा)
-
रणवीरने सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो परदेशात सफर करताना दिसत आहे. या फोटोंपैकी, ज्याने सर्वाधिक लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे युट्यूबरचा एका मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो. (फोटो क्रेडिट: रणवीर अल्लाबदिया/इन्स्टा)
-
फोटोत रणवीर अलाहाबादिया एका मुलीसोबत पोज देताना दिसत आहे, परंतु तिच्या चेहऱ्यावर सूर्यफूल इमोजी आहे. अशा स्थितीत लोक म्हणतात की ती त्याची गर्लफेंड आहे आणि आता तिचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो क्रेडिट: रणवीर अल्लाबदिया/इन्स्टा)
-
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, युट्युबर इतर कोणाला डेट करत नाही तर टीव्ही अभिनेत्री निक्की शर्मा हिला डेट करत आहे आणि त्यांना याचा पुरावाही सापडला आहे. दरम्यान, रणवीरने शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलीने काळ्या रंगाचा पोशाख घातला आहे. त्याच्यासोबत पर्स कॅरी केली आहे. (फोटो क्रेडिट: रणवीर अल्लाबदिया/इन्स्टा)
-
त्याच वेळी, निक्की शर्मानेदेखील तिच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या आउटफिटपासून फोटोंतील बॅग्राउंड सर्व काही सारखेच आहे. एवढेच नाही तर रणवीरने या पोस्टवर कमेंटही केली आहे. (फोटो क्रेडिट: निक्की शर्मा/इन्स्टा)
-
त्यामुळे आता टीव्ही अभिनेत्री निक्की शर्मा आणि रणवीर अलाहाबादिया एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (फोटो क्रेडिट: निक्की शर्मा/इन्स्टा)
-
निक्कीने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे.
-
निक्की ‘प्यार का पहला अध्याय: शिवशक्ती’, ‘माइंड द मल्होत्रास’, ‘जनम जनम का साथ’, ‘ब्रह्मराक्षस’ आणि इतर मालिकांचा भाग राहिली आहे. यापुर्वी ती टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीसोबत ‘प्यार का पहला अध्याय: शिवशक्ती’मध्ये ती दिसली होती. (फोटो क्रेडिट: निक्की शर्मा/इन्स्टा)
-
ही मालिका २०२३ मध्ये प्रसारित झाली होती. (फोटो क्रेडिट: निक्की शर्मा/इन्स्टा)
हेही पाहा- अक्षय कुमारच्या चित्रपटातील अभिनेत्रीचे हॉट फोटो व्हायरल, काळ्या रंगाच्या वन पिसमध्ये केले फोटोशूट

“माझ्या दोन्ही मुलांना हृदयविकार, उपचाराकरता आम्हाला भारतात राहू द्या”, पाकिस्तानी नागरिकाची भारताला विनंती!