-
बॉलीवूड अभिनेत्री रेखा या केवळ पडद्यावरच्या एक उत्तम कलाकार नाहीत तर त्यांनी वास्तविक जीवनही खूप चांगले जगले आहे. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)
-
सध्या त्यांच्या सौंदर्याने लोक प्रभावित होतात, पण एक काळ असा होता जेव्हा त्यांना त्यांच्या लूकवरुन इंडस्ट्रीत खूप वाईट ऐकावे लागले. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
कारकिर्दीच्या सुरुवातीला जेव्हा त्या मुंबईत आल्या तेव्हा त्यांना कधी लठ्ठ तर कधी काळी म्हटले गेले. तसेच त्या इंडस्ट्रीत काहीही करू शकणार नाहीत, असेही भाकीत अनेकांनी वर्तविले होते. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)
-
रेखा यांनी १९८५ मध्ये सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत असेही म्हटले होते की, लठ्ठ असणे हे कुरूप मानले जात होते. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)
-
कबीर बेदी यांनी मुलाखतीत रेखाबद्दल सांगितले होते आणि करिअरच्या सुरुवातीला रेखा यांना बॉडी शेमिंगचा सामना कसा करावा लागला. यासोबतच त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोपही करण्यात आले होते.
-
रेखा यांनी दिल्लीतील व्यापारी मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते आणि लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्या पतीने आत्महत्या केली होती, त्यामुळे रेखावर विविध आरोप करण्यात आले होते. मुकेश अग्रवाल यांच्या आईने तर रेखा यांना डायन म्हणून टॅग केले होते. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)
-
पतीच्या निधनानंतरही रेखा भांगेत कुंकु लावतात आणि यासाठी त्यांच्या चारित्र्यावर टीका केली गेली, लोक असेही म्हणतात की त्या अमिताभ बच्चन यांच्या नावाने कुंकु लावतात, पण रेखा यांनी यवर स्पष्टीकरण दिलेले आहे की त्या ज्या ठिकाणांहून आहेत तिथे कुंकु लावणे अगदी सामान्य आहे. (फोटो-इंडियन एक्सप्रेस)
-
मात्र, रेखा या गोष्टींकडे लक्ष न देता पुढे जात राहिल्या आणि आज त्यांच्या सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य