-
मराठी कलाविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून स्वप्नील जोशीला ओळखलं जातं.
-
आजवर त्याने ‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलंय. स्वप्नीलने नुकतीच त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
-
स्वप्नीलने नवीकोरी रेंज रोव्हर डिफेंडर गाडी खरेदी केली आहे.
-
कार खरेदी करतानाचा व्हिडीओ व काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
स्वप्नीलने नवीन गाडी घेतल्यावर त्याची किल्ली सर्वात आधी आपल्या बाबांच्या हातात सुपूर्द केली.
-
कुटुंबीयांच्या खंबीर पाठिंब्यामुळे हे स्वप्न साकार झाल्याचं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
-
स्वप्नीलच्या या नव्या गाडीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
गाडी खरेदी करताना अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. डिफेंडर कार पाहून स्वप्नीलचे आई-बाबा, पत्नी आणि दोन्ही मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
-
गाडी खरेदी करताना आजूबाजूला अभिनेत्याच्या गाजलेल्या मराठी चित्रपटांमधील संवादांचे पोस्टर लावण्यात आले होते. ही गोष्ट विशेष लक्षवेधी ठरली. ( सर्व फोटो सौजन्य : स्वप्नील जोशी इन्स्टाग्राम )

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार