-
जर तुम्हाला भयपटांची आवड असेल आणि रात्रीच्या वेळी भीतीचा अनुभव घ्यायचा असेल, तर Netflix वर अशा अनेक वेब सीरिज आहेत ज्या तुमची रात्रीची झोप उडवू शकतात. येथे आम्ही तुम्हाला अशाच ६ टॉप हॉरर वेब सीरिजबद्दल सांगत आहोत, ज्या पाहून तुम्हाला रात्री झोपताना भीती वाटेल. (Photo Source: Netflix)
-
The Haunting of Bly Manor
या वेब सिरीजमध्ये एका केअरटेकरची कथा दाखवण्यात आली आहे, जो दोन मुलांच्या घरी जाऊन त्यांची काळजी घेतो. या ९ भागांच्या मालिकेतील धक्कादायक घटना आणि पछाडलेले वातावरण तुम्हाला घाबरवू शकते. तुम्ही ही सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहू शकता. (Photo Source: Netflix) -
Guillermo del Toro’s Cabinet of Curiosities
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिरीजमध्ये ८ भीतीदायक आणि भयानक कथा दाखवण्यात आल्या आहेत. प्रत्येक भाग एका वेगळ्या भीतीदायक कथेवर आधारित आहे, जे पाहून तुम्ही भीतीने थरथर कापू शकता. ही सिरीज भयपट चाहत्यांसाठी एक परिपूर्ण पर्याय आहे. नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहता येईल. (Photo Source: Netflix) -
Midnight Mass
या वेब सिरीजने हॉरर जॉनरमध्ये एक नवीन संकल्पना आणली आहे. सिरीजचे सात भाग आहेत आणि यामध्ये एका बेटावर राहणाऱ्या १२७ लोकांची कथा आहे, ज्यांच्या आयुष्यात एक विचित्र वळण येते. तुम्हाला काहीतरी नवीन आणि वेगळे बघायचे असेल तर ही वेब सिरीज तुमच्यासाठी छान आहे. (Photo Source: Netflix) -
Marianne
ही वेब सिरीज २०१९ मध्ये रिलीज झाली होती. यामधील कथा एका प्रसिद्ध भयपट लेखकाची आहे, ज्याला भयानक घटनांचा सामना करावा लागतो. (Photo Source: Netflix) -
या मालिकेत भीतीदायक दृश्यांची कमी नाही आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल. Netflix वर देखील पाहता येईल. (Photo Source: Netflix)
-
The Haunting of Hill House
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या या वेब सिरीजमध्ये एका भयानक घटनांचा सामना करणाऱ्या कुटुंबाची रंजक कथा दाखवण्यात आली आहे. भूतकाळ आणि वर्तमानात अडकलेले हे कुटुंब विविध प्रकारच्या भीतीदायक आणि रहस्यमय अनुभवांमधून जात आहे. यामध्ये अनेक सीन्स आहेत जे पाहून तुम्ही थरथर कापालं. सिरीज Netflix वर उपलब्ध आहे, आणि हिंदीमध्ये देखील पाहता येते. (Photo Source: Netflix) -
The Midnight Club
ही वेब सिरीज तुम्हाला गोंधळात टाकेल. कथा एका पुनर्वसन केंद्राची आहे, जिथे काही रुग्ण मृत्यूच्या अगदी जवळ असतात. यामध्ये ८ तरुण आहेत. ही सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहू शकता. (Photo Source: Netflix)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल