-
आता दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लू अर्जुन स्टारर ‘Pushpa 3: the rampage’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. चित्रपटगृहांमध्ये Pushpa 2 ला खूप प्रेम मिळत आहे. असे असले तरीही तिसऱ्या भागाकडूनही चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. मात्र, त्यांची उत्कंठा वाढण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे कोणता मोठा खलनायक पार्ट 3 मध्ये दिसणार? दरम्यान, माध्यामंतील माहितीनुसार यासाठी आता विजय देवरकोंडाचे नाव समोर येत आहे, जो श्रीवल्लीचा रिअल लाईफ सामी आहे. जाणून घेऊयात त्याच्या मालमत्तेबद्दलची माहिती. (Photo- Rashmika And Vijay Deverakonda/Instagram)
-
विजय देवरकोंडाने 2011 पासून आतापर्यंत त्यांच्या करिअरमध्ये एकूण 15 चित्रपट केले आहेत. त्यापैकी येवडे सुब्रमण्य, टॅक्सीवाला, कुशी आणि अर्जुन रेड्डी हिट ठरले आणि पेल्ली चोपुलु आणि महानटी हे ब्लॉकबस्टर ठरले. तर गीता गोविंदमही सुपरहिट ठरला. म्हणजे त्याचे फक्त 6 चित्रपट चालले आणि बाकीचे फ्लॉप झाले. (Photo- Vijay Deverakonda/Instagram)
-
विजय देवरकोंडाच्या बुडत्या कारकिर्दीला कदाचित केवळ सुकुमारच वाचवू शकतील, जेव्हा तो पुष्पा या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमध्ये खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येईल. दरम्यान, श्रीवल्लीचे पात्र संपणार का हे पाहणेही महत्वाचे असेल. (Photo- Vijay Deverakonda/Instagram)
-
GQ India च्या मते, विजय देवरकोंडाची एकूण संपत्ती 39 करोड डॉलर आहे. त्याने हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये 15 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे, जो शहरातील सर्वात पॉश भागांपैकी एक आहे. तेथे तो त्याचे कुटुंबरोबर राहतो आणि त्याच्याकडे स्टॉर्म नावाचा सायबेरियन हस्की जातीचा कुत्राही आहे. (Photo- Vijay Deverakonda/Instagram)
-
विजय देवरकोंडाने GQ ला त्याच्या हैदराबादच्या घराबद्दल सांगितले होते, ‘मी इतके मोठे घर घेतले आहे, याची मला कधी कधी भीती वाटते, आपल्याला सुरक्षित वाटण्यासाठी आई हवी असते, जी घराला घरपण देते ‘ v
-
‘अर्जुन रेड्डी’चे स्वतःचे खाजगी जेट देखील आहे, ज्याद्वारे तो आपल्या कुटुंबासह आणि पाळीव कुत्र्यासोबत प्रवास करतो. (Photo- Vijay Deverakonda/Instagram)
-
GQ India च्या मते, त्याच्याकडे 64 लाख रुपयांची रेंज रोव्हर आणि 85 लाखांपेक्षा जास्त किमतीची व्हॉल्वो XC90 आहे. (Photo- Vijay Deverakonda/Instagram)
-
विजय देवरकोंडाचे हैदराबादमध्ये ‘गुड वाइब्स ओन्ली’ नावाचे कॅफे आहे, जे त्याने मित्रांच्या मदतीने सुरू केले आहे. (Photo- Vijay Deverakonda/Instagram)
-
विजय देवरकोंडा ‘हैदराबाद ब्लॅकहॉक्स’ या प्रादेशिक व्हॉलीबॉल संघाचा मालकदेखील आहे. त्याने संघातील समभाग खरेदी करण्यासाठी सुमारे 160 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती आहे. (Photo- Vijay Deverakonda/Instagram)
-
एका चित्रपटासाठी तो 12 कोटी रुपये मानधन घेतो, असे म्हटले जाते. मात्र, आता Pushpa 3: the Rampage साठी तो किती फी घेणार, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
हेही पाहा- Pushpa 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बनवले 11 नवे रेकॉर्ड्स

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”