-
झी मराठी वाहिनीवरील `लाखात एक आमचा दादा`फेम कोमल मोरेने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
झी मराठीवरील या मालिकेत कोमल मोरे म्हणजेच सूर्या कॅदादाची बहीण तेजू हिच्या लग्नाची गडबड चालू आहे.
-
या लग्नसोहळ्यामधील एक दिवस म्हणजे मेहेंदीचा कार्यक्रम.
-
या कार्यक्रमासाठी तेजू म्हणजेच कोमलने हिरव्या रंगाची सिल्क साडी परिधान केली आहे.
-
या पोस्टमध्ये कोमलच्या हातातली मेहेंदी सुरेख दिसत आहे.
-
या साडीला सोनेरी रंगाची सुरेख किनार आहे.
-
या साडीवर कोमलने हलका हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लॉऊज परिधान केला आहे.
-
कोमलच्या या लूकला अधिक सौंदर्य गळ्यातील मोत्याचा हार आणि मोत्याच्या कानातल्यांमुळे लाभले आहे.
-
या साडीवर कोमलने हलक्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. या साडीला कोमलने डिझायनर कमरपट्टा बांधला आहे.
(सर्व फोटो सौजन्य : कोमल मोरे/ इंस्टाग्राम)