-
‘बिग बॉस’फेम जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर तिच्या खास लूकचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये जान्हवी किल्लेकर बऱ्याचदा चर्चेत होती.
-
अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.
-
या लूकसाठी जान्हवीने निळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
जान्हवीचा हा ड्रेस थ्री पीस असून यामध्ये टॉप, मोठा स्कर्ट आणि ओढणीचा समावेश आहे.
-
जान्हवीच्या या टॉपला पुढच्या बाजूने मण्यांची लटकन शोभून दिसत आहे.
-
संपूर्ण ड्रेसवर विविध फुलांची प्रिंट दिसत आहे.
-
जान्हवीने ओढणीला जॅकेटप्रमाणे परिधान केले आहे.
-
या ड्रेसवर जान्हवीने रोज गोल्ड दागिने परिधान केले असून डिझायनर रोज गोल्ड आणि निळ्या रंगाचे कानातले तिने परिधान केले आहेत.

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का