-
गेल्या काही वर्षांत बॉलीवूड चित्रपटांशिवाय साऊथ चित्रपटांचीही क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. साऊथचे निर्माते अनोख्या आणि सत्य घटनांशी संबंधित असलेले खास प्रोजेक्ट घेऊन येत असल्यामुळे साऊथच्या सिनेमाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
-
पण तुम्हाला दक्षिणेतील काही मोठ्या स्टार्सची नेट वर्थ माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया अल्लू अर्जुन ते प्रभास एकूण संपत्ती किती आहे?
-
अल्लू अर्जुन
‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा-२’ या चित्रपटांनंतर नॅशनल स्टार बनलेला साऊथचा सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याची एकूण संपत्ती ३५० कोटी रुपये आहे. ‘पुष्पा – द राइज’ नंतर अभिनेत्याने त्याच्या फीमध्ये लक्षणीय वाढ केल्याचे वृत्त आहे. -
थलपथी विजय
दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेत्यांच्या यादीत थलपथी विजयचेही नाव आहे. लिओ, गॉट आणि मास्टर सारख्या चित्रपटांचा भाग असलेला अभिनेता विजयची एकूण संपत्ती ४७४ कोटी रुपये आहे आणि तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतो. -
रजनीकांत
सुपरस्टार रजनीकांत यांच्याशिवाय ही यादी अपूर्ण आहे. रजनीकांत यांची एकूण संपत्ती ४५० कोटी रुपये आहे हे अनेकांना माहीत नाही. त्यांच्या वत्तेयान’ या चित्रपटासाठी त्यांनी १२५ कोटी रुपये घेतल्याचीही माहिती आहे. -
प्रभास
बाहुबली आणि सालार सारख्या चित्रपटांचा भाग असलेला अभिनेता प्रभासची नेट वर्थ धक्कादायक आहे. दक्षिणेतील या स्टारची एकूण संपत्ती २४१ कोटी रुपये आहे. एका रिपोर्टनुसार, प्रभासने कल्की २८९८ एडीसाठी १०० कोटी रुपये चार्ज केले होते. -
अजित कुमार
दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत अजित कुमार यांचेही नाव आहे. अनेक ॲक्शन हिट चित्रपट देणाऱ्या अजित कुमार यांची एकूण संपत्ती ९६ कोटी रुपये आहे. त्यांच्या थुनिवो या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १३० कोटींचा व्यवसाय केला. -
कमल हासन
कल्की २८९८ AD या चित्रपटात कमल हासन यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. पुढील भागात त्यांचे पात्र पुन्हा दिसणार आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की कमल हसनची एकूण संपत्ती १५० कोटी रुपये आहे. (अभिनेत्यांच्या एकूण संपत्तीचे हे आकडे इकॉनॉमिक टाइम्समधून घेतले आहेत.)

Highest Total in Champions Trophy: इंग्लंड संघाने घडवला इतिहास, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील उभारली सर्वात मोठी धावसंख्या