-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायिका जुईली जोगळेकरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
जुईली आणि रोहित राऊत हे दोघेही नवरा बायको असून हे जोडपं नेहमीच चर्चेत असतं.
-
बऱ्याच मालिकांचे शीर्षकगीत या जोडप्याने एकत्र गायले आहे. त्यातील एक म्हणजे सध्या सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेली ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेसाठी गायलेले शीर्षकगीत.
-
जुईलीचे बरेच कॉन्सर्ट शो लोकप्रिय आहेत.
-
या लूकसाठी जुईलीने पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे.
-
यामध्ये सलवार कमीज आणि त्यावर ओढणी परिधान केली आहे.
-
या फोटोशूटसाठी जुईलीने केस मोकळे सोडले असल्यामुळे तिचे सौंदर्य खुलून आलेले दिसत आहे.
-
या ड्रेसवर जुईलीने झुमके परिधान केल्यामुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.
-
या फोटोमध्ये जुईलीने ओढणी कॅमेराच्या दिशेने उडवत पोज दिली आहे.
-
चेहऱ्यावरील मेकअप आणि सूर्याच्या पडणाऱ्या हलक्या प्रकाशामुळे जुईलीची सुंदरता झळाळून आली आहे.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत जुईलीने ‘ Who played this Song when He was Clicking my pictures?’ असे अनोखे कॅप्शन दिले आहे.
(सर्व फोटो सौजन्य : जुईली जोगळेकर / इंस्टाग्राम)

माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”