-
आई अन् लेकीचं नातं कायमचं खूप घट्ट असतं.
-
सुप्रिया आणि श्रिया पिळगांवकर या मायलेकीची जोडी मराठी कलाविश्वात खूपच लोकप्रिय आहे.
-
या दोघी सध्या कोकण फिरायला गेल्या आहेत.
-
कोकणभ्रमंतीचे सुंदर आणि निसर्गरम्य फोटो श्रिया पिळगांवकरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
श्रियाने या फोटोंना ‘कोकणाची जादू’ असं कॅप्शन दिलं आहे. याशिवाय आईबरोबर फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो असं म्हणत तिने सुप्रिया पिळगांवकरांबरोबर अतिशय गोड फोटो शेअर केला आहे.
-
नारळ-सुपारीच्या बागा, जंगलातील ट्रेक, खळखळून वाहणारी नदी या सगळ्याची झलक श्रियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळते.
-
गुहागरचे समुद्रकिनारे, हर्णेपासून जवळ असलेलं केशवराज मंदिर या ठिकाणचे फोटो देखील श्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
श्रियाने शेअर केलेले कोकणातील निसर्गरम्य फोटो पाहून अभिनेता स्वप्नील जोशीने “मला पण तिथे यायचंय” अशी कमेंट केली आहे.
-
तर, श्रियाच्या अन्य चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत ‘कोकण म्हणजे सुख’ असं म्हटलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम )
विद्यार्थ्याशी वर्गातच लग्न केलं, व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं महिला प्राध्यापिकेनं घेतला मोठा निर्णय