-
भारतात १ जानेवारी ते २५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीमध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व वेब सीरिजपैकी ज्या सीरिजमध्ये सरासरी IMDb युजर रेटिंग ५ किंवा त्याहून अधिक असेल अशा सीरिजमधून ही १० टायटल्स सातत्याने IMDb ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होती. हे जगभरातील २५ कोटींहून अधिक IMDb विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार निर्धारित झाले आहे.
-
१. हीरामंडी: द डायमंड बाजार (Heeramandi: The Diamond Bazaar) ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
-
२. मिर्झापूर (Mirzapur) मिर्झापूर ही प्राईम व्हिडीओची एक सुपरहिट सीरिज आहे.
-
३. पंचायत (Panchayat) प्राइम व्हिडीओच्या या सीरिजला IMDbवर ९ रेटिंग मिळाले आहे.
-
४. ग्यारह ग्यारह (Gyaarah Gyaarah) ही वेब सीरिज झी५ वर पाहता येईल.
-
५. सिटाडेल: हनी बनी (Citadel: Honey Bunny) अभिनेता वरुण धवन आणि सामंथा रुथ प्रभूची ही वेब सीरिज चांगलीच गाजली.
-
६. मामला लीगल है (Maamla Legal Hai) ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.
-
७. ताज़ा खबर (Taaza Khabar) अभिनेत्री श्रिया पिळगांवकर आणि भुवन बामची ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे.
-
८. मर्डर इन माहिम (Murder In Mahim) ही वेब सीरिज जिओ सिनेमावर पाहता येईल.
-
९. शेखर होम (Shekhar Home) ही वेब सीरिज जिओ सिनेमावर पाहता येईल.
-
१०. द ग्रेट इंडीयन कपिल शो (The Great Indian Kapil Show) ही IMDb च्या वर्षाच्या शेवटी येणाऱ्या यादीमधील नॉन- फिक्शन प्रकारातील पहिली सिरीज आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वेब सीरिज इन्स्टाग्राम)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा