-
‘झी मराठी’ वाहिनीवर २०२२ मध्ये ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.
-
जवळपास २ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
-
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे, एकता डांगर, अमृता रावराणे, श्वेता मेहेंदळे, अजिंक्य जोशी, अभिजीत केळकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या.
-
या मालिकेची कथा सुद्धा काहिशी हटके होती. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा आतुरतेने ही मालिका पाहायचे.
-
आता २१ डिसेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाल्यावर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल. तत्पूर्वी शेवटच्या भागाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर सेटवर भावनिक वातावरण निर्माण झालं होतं.
-
जवळपास दोन वर्षे एकत्र काम करून या मालिकेच्या सहकलाकारांमध्ये एक घट्ट नातं तयार झालं आहे.
-
याच पार्श्वभूमीवर, “नेत्रा म्हणून शेवटचा दिवस”, “एक अध्याय संपला”, “एक प्रवास – ७४८ एपिसोड” असे सुंदर कॅप्शन लिहित मालिकेच्या कलाकारांनी भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत.
-
दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका रात्री १०.३० वाजता प्रसारित केली गेली.
-
आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका संपल्यावर याची जागा कोणती नवीन मालिका घेणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. (सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे, अमृता रावराणे, ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्राम अकाऊंट )

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…