य
य
य
-
राज कपूर म्हणजे असा हरहुन्नरी माणूस ज्याने आपल्या चित्रपटांमधून सामाजिक आशय, सामान्य माणूस, त्याला भेडसावणाऱ्या समस्या यांवर भाष्य केलं. (सर्व फोटो-राज कपूर इन्स्टाग्राम)
-
राज कपूर यांचं जन्मशताब्दी वर्ष, असा कलाकार होणे नाही. (फोटो-राज कपूर, इन्स्टाग्राम)
-
पृथ्वीराज कपूर यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर राज कपूर वयाच्या ११ व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करु लागले.
-
राज कपूर आणि मधुबाला यांचा अभिनय असलेला नीलकमल हा नायक म्हणून त्यांचा पहिला सिनेमा होता. जो लोकांना खूप आवडला. त्याआधी त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या होत्या.
-
राज कपूर आणि नर्गिस यांची जोडी सुपरहिट ठरली. या दोघांची ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली.
-
राज कपूर आणि नर्गिस या जोडीने एकाहून एक सरस चित्रपट दिले. या जोडीचा खास चाहता वर्ग होताच. मात्र व्यक्तिगत आयुष्यात हे दोघंही एकत्र येऊ शकले नाहीत.
-
नर्गिस आणि सुनील दत्त यांचं लग्न झाल्यानंतर राज कपूर हे मद्याच्या आहारी गेले होते. त्यांना नर्गिस यांचा विरह सहन झाला नाही. ते कायम त्याबाबत बोलत असत.
-
राज कपूर यांनी मेरा नाम जोकर या सिनेमाची निर्मिती पाच वर्षे केली. मात्र तो सिनेमा प्रदर्शित झाल्यावर चालला नाही. त्याचं त्यांना दुःख झालं होतं.
-
मात्र एका मुलाखतीत रणधीर कपूर यांनी सांगितलं होतं की आर. के. स्टुडिओचा सर्वात सुपरहिट आणि सर्वाधिक कलेक्शन करणारा सिनेमा म्हणून मेरा नाम जोकरची नोंद आता झाली आहे. त्याचं राज कपूर यांना नक्कीच समाधान झालं असेल.
-
राज कपूर हे एक हरहुन्नरी कलावंत होते.
-
राज कपूर यांच्या आयुष्यावर चार्ली चॅप्लिनचा खूप प्रभाव होता. त्याची झलक त्यांच्या अभिनयात दिसून येत असे.
-
वैजंयती माला यांच्यासह राज कपूर यांनी केलेला संगम हा चित्रपटही खूप गाजला.
-
सिनेमासृष्टीत राज कपूर यांचं खूप मोठं योगदान आहे. या लोभस, गोंडस आणि भूमिका जगणाऱ्या कलाकाराला विसरणं कुणालाही शक्य नाही हीच त्यांच्या भूमिकांची जादू आहे.