-
कपूर कुटुंबातील असूनही हे कलाकार फ्लॉप ठरले
बॉलीवूड चित्रपटसृष्टीवर कोणी राज्य केले असेल तर ते कपूर घराण्याने. या घराण्याच्या अनेक पिढ्यांनी बॉलिवूडवर आपली हुकुमत गाजवली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर नेण्यात राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर यांचे मोठे योगदान आहे. पण कपूर घराण्यातून येणारी अनेक नावे अशीही आहेत जी पूर्णपणे फ्लॉप ठरली. चला जाणून घेऊया या यादीत कोण आहे. -
राजीव कपूर
राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर यांनी १९८३ मध्ये ‘एक जान हैं हम’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ते वडिलांच्या शेवटच्या ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटामध्ये दिसले होते. या चित्रपटानंतर राजीव कपूर यांचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. त्यानंतर त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनात हात आजमावला पण तिथेही त्यांना अपयश मिळाले. -
कुणाल कपूर
शशी कपूर यांचा मुलगा आणि पृथ्वीराज कपूर यांचा नातू कुणाल कपूर यांनी १९७२ साली सिद्धार्थ या इंग्रजी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्यांनी जुनून, विजेता, आहिस्ता-आहिस्ता, उत्सव आणि त्रिकाल यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. सहा चित्रपटांनंतरही कुणाल यांना प्रसिद्धी मिळाली नाही, तेव्हा त्यांनी इंडस्ट्री सोडली आणि ॲड फिल्म कंपनी सुरू केली. -
आदित्य राज कपूर
शम्मी कपूर आणि गीता बाली यांचे चिरंजीव आदित्य राज कपूर यांनी ‘चेस’, ‘दिवानगीने हद कर दी’, ‘येस और नही’ आणि ‘यमला पगला दिवाना २’ सारख्या चित्रपटांमध्ये साइड ॲक्टर म्हणून काम केले होते, पण तेही फ्लॉप ठरले. -
करण कपूर
शशी कपूर आणि जेनिफर यांचा मुलगा करण कपूर यांनी १९८६ मध्ये सनी देओल, धर्मेंद्र आणि श्रीदेवी यांच्या ‘सलतनत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर करण लोहा आणि अफसर सारख्या चित्रपटात झळकले पण विदेशी अभिनेत्यासारखे दिसत असल्याने त्यांना काम मिळणे बंद झाले. यानंतर त्यांनी अभिनय सोडून फोटोग्राफी सुरू केली आणि लंडनला शिफ्ट झाले. -
संजना कपूर
शशी कपूर यांच्या तीन मुलांना बॉलीवूडमध्ये ठसा उमटवता आला नाही. या यादीत त्यांची मुलगी संजना यांचाही समावेश आहे. संजना यांनी ‘हीरो हिरालाल’ चित्रपटात लीड म्हणून काम केले होते. मात्र काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी अभिनयक्षेत्र सोडले. -
अरमान जैन
शोमॅन राज कपूर यांचा नातू आणि रीमा कपूर यांचा मोठा मुलगा अरमान जैन याने २०१४ मध्ये आलेल्या ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तोही आपल्या अभिनयाची जादू इंडस्ट्रीत निर्माण करू शकला नाही. -
आधार जैन
अरमान जैनचा धाकटा भाऊ आधार जैन याने २०१७ मध्ये आलेल्या ‘कैदी बँड’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तो ‘खेल-खेल में’ चित्रपटाचा भाग होता. पण तोदेखील आपला ठसा उमटवू शकला नाही. (सर्व फोटो – सोशल मीडिया)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”