-
सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, याचे श्रेय AI ने तयार केलेल्या छायाचित्रांना जाते, ज्यामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसत आहेत. या फोटोंनी सर्वांनाच धक्का दिला आहे. कलाकार साहिद एसके यांनी एआय आणि फोटोशॉपच्या मदतीने ही छायाचित्रे तयार केली आहेत, जी प्रचंड व्हायरल होत आहेत. (फोटो स्रोत: @sahixd/threads.net)
-
एकेकाळी बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे मानल्या जाणाऱ्या सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याचा प्रवास जरी खूप आधी संपला असेल, पण त्यांच्या जोडीच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. AI च्या मदतीने त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहणे ही चाहते आणि नेटिझन्ससाठी पर्वणीच ठरली आहे. (फोटो स्रोत: @sahixd/threads.net)
-
AI ने तयार केलेल्या या चित्रांमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय पूर्णपणे नव्या अवतारात दिसत आहेत. ही छायाचित्रे पाहता हे दोघेही जणू समांतर विश्वात मुंबईच्या गल्लीबोळात एकत्र फिरायला निघाल्यासारखे वाटते. (फोटो स्रोत: @sahixd/threads.net)
-
एका फोटोत सलमान आणि ऐश्वर्या मुंबईतील एका स्थानिक बाजारात खरेदी करताना दिसत आहेत. दोघांनीही मॅचिंग आउटफिट्स परिधान केले आहेत, ज्यामुळे हा फोटो अधिक खास वाटतोय. (फोटो स्रोत: @sahixd/threads.net)
-
दुसऱ्या छायाचित्रात दोघेही वडा पाव खाताना दिसत आहेत. मुंबईची खरी ओळख आणि स्थानिक चव अनुभवणारी त्यांची जोडी खूपच क्यूट दिसतेय. (फोटो स्रोत: @sahixd/threads.net)
-
एका छायाचित्रात दोघेही कॅफेमध्ये कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू अगदी खरे वाटत आहे. (फोटो स्रोत: @sahixd/threads.net)
-
दुसऱ्या एका फोटोमध्ये सलमान आणि ऐश्वर्या आईस्क्रीम शेअर करताना दिसत आहेत. या फोटोंनी चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. सोशल मीडियावर लोक या फोटोंवर जोरदार कमेंट आणि शेअर करत आहेत. (फोटो स्रोत: @sahixd/threads.net)
-
AI ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की कल्पनेला मर्यादा नसते. एआय आणि फोटोशॉपसारख्या साधनांच्या मदतीने आता अशा कल्पनाही साकारता येतात ज्या पूर्वी अशक्य वाटत होत्या. हा केवळ कल्पनेचा भाग असला तरी AI मुळे कल्पनारम्य आणि वास्तव यांच्यातील अंतर किती कमी झाले आहे हे यातून समजता येते. (फोटो स्रोत: @sahixd/threads.net)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”