-
मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत ‘रॉकेट’ची भूमिका साकारणाऱ्या प्रशांत निगडेचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात संपन्न झाला आहे.
-
अभिनेत्याच्या लग्नाला कलाविश्वातील बरीच मंडळी उपस्थित होती.
-
प्रशांतची पत्नी सुद्धा अभिनेत्री आहे.
-
प्रशांत निगडेने विरीशा नाईकशी लग्नगाठ बांधली आहे.
-
विरीशा नाईक ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत चंचला हे खलनायिकेचं पात्र साकारत आहे.
-
प्रशांत आणि विरीशा यांनी लग्नसोहळ्यात मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळालं.
-
प्रशांत आणि विरीशा सध्या ‘आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ’ या नाटकात नवरा-बायकोची भूमिका साकारत आहेत.
-
लग्नसोहळा पार पडल्यावर प्रशांत आणि विरीशावर संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ( फोटो सौजन्य : विरीशा नाईक इन्स्टाग्राम )
य