-
2024 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. या वर्षी अनेक बॉलीवूड स्टार्स लग्नबंधनात अडकले आहेत.
-
वर्षाची सुरुवात आमिर खानची मुलगी आयरा खानच्या लग्नाने झाली. आयराने 3 जानेवारी 2024 रोजी फिटनेस कोच नुपूर शिखरेशी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. यानंतर, 10 जानेवारी 2024 रोजी उदयपूरमध्ये या जोडप्याने डेस्टिनेशन वेडिंग केले. यानंतर त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईत पार पडले. (फोटो – आयरा खान इन्स्टाग्राम)
-
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी या वर्षी फेब्रुवारीमध्ये विवाहबद्ध झाले. 21 फेब्रुवारी 2024 रोजी दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले होते. रकुल आणि जॅकीच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांशिवाय अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. (फोटो- रकुल प्रीत इन्स्टाग्राम)
-
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनीही यंदा लग्न केले. सप्टेंबरमध्ये पारंपारिक पद्धतीने दोघांनी लग्न केले. (फोटो – अदिती राव हैदरी इन्स्टाग्राम)
-
अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा मार्चमध्ये विवाहबद्ध झाले. दोघांचे लग्न दिल्लीत झाले. जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. (फोटो – पुलकित सम्राट इन्स्टाग्राम)
-
जून महिना सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालसाठी आनंदाचा दिवस घेऊन आला. या जोडप्याने 23 जून रोजी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत लग्न केले. यानंतर लग्नाचे रिसेप्शन पार पडले. (फोटो – सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम)
-
डिसेंबर महिन्यात नागा चैतन्यने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. (फोटो – सोभिता धुलिपाला इन्स्टाग्राम)
-
नागा चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. (फोटो – सोभिता धुलिपाला इन्स्टाग्राम)
-
४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमध्ये दोघांचा लग्नसोहळा पार पडला. (फोटो – सोभिता धुलिपाला इन्स्टाग्राम)

Saudi Arabia Ban Visa : सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी, कारण काय?