-
अभिनेत्री नम्रता शिरोडकरची थोरली बहीण, अभिनेत्री शिल्पा शिरोडकर सध्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात स्पर्धक म्हणून पाहायला मिळत आहे.
-
शिल्पा शिरोडकर ही ९०च्या दशकातील बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री असून सेन्सेशनल क्वीन म्हणून तिला ओळखलं जायचं. अशा या लोकप्रिय शिल्पा शिरोडकरबद्दल जाणून घ्या…
-
शिल्पा १० नापास आहे. पण संपत्तीबाबतीत ती धाकटी बहीण नम्रतापेक्षा श्रीमंत आहे. १९८९मध्ये रमेश सिप्पी यांच्या ‘भ्रष्टाचार’ चित्रपटातून शिल्पाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
-
२०००मध्ये लग्नानंतर शिल्पाने बॉलीवूडला रामराम केलं. ती लंडनला गेली आणि तिथे ती वैवाहिक आयुष्य एन्जॉय करून लागली.
-
लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सर्वकाही सोडून शिल्पा गृहिणी झाली. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितलं होतं की, १०वी नापास असल्यामुळे परदेशात नोकरी करू शकली नाही.
-
तसंच अभिनेत्री सांगितलं होतं की, १०वी नापास असल्याची लाज वाटत नाही. कारण ती नेहमी अभ्यासात कमकुवत होती. त्यामुळेच ती अभिनयात आली आणि त्याशिवाय काही करू शकली नाही.
-
शिल्पाने लंडनमधील राहणारा बँकर अपरेश रंजीतबरोबर लग्न केलं. दोघांना एक मुलगी असून तिचं अनुष्का नाव आहे. अनुष्का लंडनमध्येच राहत आहे. तसंच तिथेच शिक्षण घेत आहे.
-
माध्यमांच्या वृत्तांनुसार, शिल्पाची २३७ कोटींची संपत्ती आहे. पण धाकटी बहीण नम्रताची संपत्ती फक्त ५० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – शिल्पा शिरोडकर इन्स्टाग्राम

Pahalgam Terrorist Attack : “माझ्या नवऱ्यावर दहशतवाद्यांनी पहिली गोळी झाडली, सरकारने…”, शुभम द्विवेदीच्या पत्नीची मागणी काय?