-
Kantara: Chapter 1
‘कंतारा: चॅप्टर 1’ चा सिक्वेल 2 ऑक्टोबर 2025 रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या उत्तुंग यशानंतर त्याचा पुढचा भागाकडूनही मोठ्या अपेक्षा असणार आहेत. (Still From Film) -
Animal Park
‘ॲनिमल’च्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये ‘ॲनिमल पार्क’ची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचा पुढचा भाग रणबीर कपूरच्या उग्र अवतारातील अभिनयाने आणखी गडद आणि सस्पेन्सने भरलेला असणार आहे. (Still From Film) -
Kaithi 2
‘कैथी’च्या सिक्वेल ‘कैथी २’ची घोषणा दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी केली. हा चित्रपट जबरदस्त कथा आणि जबरदस्त ॲक्शनसाठी देखील ओळखला जाईल. (Still From Film) -
Housefull 5
हाऊसफुल फ्रेंचायझीचा पुढचा चित्रपट ‘हाऊसफुल 5’ देखील प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन हे जबरदस्त त्रिकूट या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. (Still From Film) -
Hera Pheri 3
हेरा फेरीचा तिसरा भाग जाहीर झाला असून यावेळीही अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी आपल्या दमदार कॉमेडी आणि ॲक्शनने प्रेक्षकांना हसवणार आहेत. (Still From Film) -
Jailer 2
‘जेलर’च्या यशानंतर आता चित्रपटाचा दुसरा भागही जाहीर झाला आहे. हा चित्रपट देखील पूर्वीपेक्षा अधिक थ्रिल आणि ॲक्शनने परिपूर्ण असेल. (Still From Film) -
Kalki 2
‘कल्की 2898 एडी’ च्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये ‘कल्की 2’ ची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट एक सायन्स फिक्शन असेल, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. (Still From Film) -
KGF Chapter 3
‘KGF Chapter 3’ ची घोषणा ‘KGF Chapter 2’ च्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये करण्यात आली. या सिनेमाचा पुढचा भाग आणखी ॲक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असेल. (Still From Film) -
Mirzapur: The Film
‘मिर्झापूर’ सिरीज चित्रपट स्वरूपात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालिन भैया, गुड्डू भैया आणि मुन्ना भैया आता मोठ्या पडद्यावरही आपली जादू दाखवणार आहेत. (Still From Film) -
Pushpa 3: The Rampage
‘पुष्पा 2: द रुल’ च्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये ‘पुष्पा 3’ ची घोषणा करण्यात आली. ॲक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असलेल्या अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. (Still From Film) -
Salaar 2: Shouryanga Parvam
‘सलार: सीझफायर’च्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये ‘सलार 2’ ची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाचा पुढचा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. (Still From Film) -
War 2
‘वॉर 2’ ऑगस्ट 2025 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसोबत साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरही दिसणार आहे. या दोघांना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. (Still From Film)
हेही पाहा- Photos : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम धनश्री काडगावकरचा दुबईमध्ये सफरनामा, पाहा फोटो
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती