-
बॉलीवूड चित्रपटांना त्यातील गाणी हॉलीवूड चित्रपटांपेक्षा वेगळे बनवतात. गेल्या काही दशकांत बॉलीवूड चित्रपटसृष्टीने खूप मोठी मजल मारली आहे. दरम्यान, एक काळ असाही होता की चित्रपटांमध्ये अनेक गाणी असायची आणि प्रत्येक गाण्याची लांबीही बऱ्यापैकी मोठी असायची.
-
पण आज तसे होत नाही. चित्रपटात गरज नसल्यास निर्माते मर्यादित गाणी ठेवतात. दरम्यान, सर्वाधिक गाणी असलेल्या काही हिंदी चित्रपटांची नावे तुम्हाला माहीत आहेत का?
-
हम आपके है कौन
या यादीत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या चित्रपटांचीही नावे आहेत. १९९४ मध्ये रिलीज झालेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटानेही गाण्यांच्या बाबतीत रेकॉर्ड बनवले होते. या कौटुंबिक चित्रपटात एक दोन नव्हे तर एकूण १४ गाणी होती. -
सिलसिला
१९८१ मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्या ‘सिलसिला’ चित्रपटातही भरपूर गाणी आहेत. या चित्रपटात एकूण १२ गाणी आहेत, त्यापैकी आजही अनेक रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये त्यांना जागा आहे. -
ताल
१९९९ मध्ये रिलीज झालेला अनिल कपूर आणि अक्षय खन्ना यांचा चित्रपट ‘ताल’ देखील या यादीत सामील आहे. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटात १२ गाणी होती जी त्यावेळी खूप गाजली होती. चित्रपटाचे टायटल ट्रॅक आजही खूप लोकप्रिय आहे. -
तेरे नाम
या यादीत सलमान खानचा आणखी एक चित्रपट आहे. २००३ मध्ये रिलीज झालेला सलमान खानचा सुपरहिट चित्रपट ‘तेरे नाम’ मध्ये देखील एकूण १२ गाणी होती ज्यांना खूप लोकप्रियता मिळाली होती. -
देवदास
या यादीत आणखी एक प्रसिद्ध नाव आहे ते म्हणजे शाहरुख खानचा मल्टीस्टारर चित्रपट ‘देवदास’. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात एकूण १० गाणी होती जी खूप लोकप्रिय आहेत. -
इंद्रसभा
१९३२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंद्रसभा’ या चित्रपटापात सर्वाधिक गाणी आहेत. Gaana.com च्या रिपोर्टनुसार हा बॉलिवूड चित्रपट आहे ज्यामध्ये सर्वाधिक गाणी होती. निर्मात्यांनी या चित्रपटात तब्बल ७० हून अधिक गाणी समाविष्ट केलेली आहेत.
Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य