-
2024 ची बहुचर्चित वेब सीरिज ‘हीरामंडी’ ही OTT वर सर्वाधिक पाहिली गेलेली आणि Google वर सर्वाधिक सर्च झालेली सीरिज ठरली. संजय लीला भन्साळी यांच्या या मालिकेत सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, ताहा शाह बदुशा आणि मनीषा कोईराला यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. (फोटो – मनीषा कोईराला इन्स्टाग्राम)
-
‘हीरामंडी’ 1 मे 2024 मध्ये Netflix वर रिलीज करण्यात आली होती. आता पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान तिच्या ताज्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. 15 वर्षांपूर्वी ही सीरिज ऑफर झाली होती, असा खुलासा तिने केला. पण, तिला यात का घेण्यात आलं नाही, यामागचे कारण जाणून घेऊयात. (फोटो- माहिरा खान/इन्स्टा)
-
माहिरा खानने अलीकडेच बीबीसी एशियन नेटवर्कशी संवाद साधला. तिने तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि करिअरबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. माहिराचे भारतात खूप चाहते आहेत. तिने ‘रईस’मधून बॉलीवूड पदार्पण केले होते. आता तिने सांगितलं की तिला १५ वर्षांपूर्वी ‘हिरामंडी’ची ऑफर आली होती. त्यावेळी ही सीरिज नाही तर चित्रपट होता. (फोटो- माहिरा खान/इन्स्टा)
-
माहिराने म्हणाली की तिला संजय लीला भन्साळी आवडतात आणि ती त्यांच्या कामाची मोठी चाहती आहे. ती 15 वर्षांपूर्वी तिच्या बालपणीच्या मित्राच्या लग्नाला गेली होती आणि तिची मैत्रीण एका भारतीय मुलाशी लग्न करत होती. ती मुंबईत होती आणि भन्साळी त्यावेळी पाकिस्तानी अभिनेत्रीच्या शोधात होते. (फोटो- माहिरा खान/इन्स्टा)
-
अभिनेत्रीने सांगितले की मोईन बेग आणि डिझायनर रिजवान बेग बोलत होते की त्यांना कोणतीही मुलगी सापडली नाही. त्यावेळी मोईन बेगने तिची भन्साळींशी ओळख करून दिली. (फोटो- माहिरा खान/इन्स्टा)
-
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने सांगितले की तिने दिग्दर्शकासाठी फोटोशूट देखील केले होते आणि भन्साळीने तिला ‘हीरामंडी’ ऑफर देखील केली होती. (फोटो- माहिरा खान/इन्स्टा)
-
‘रईस’ स्टारने दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी तिचे लग्न झाले होते, पण तिला भन्साळींना हे सांगू नकोस असं सांगण्यात आलं होतं. मात्र माहिराने हे मान्य केलं नाही कारण तिला तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात खोटं बोलून करायची नव्हती. (फोटो- माहिरा खान/इन्स्टा)
-
माहिराने भन्साळींना लग्नाबद्दल सांगितलं आणि त्यांना त्याबद्दल काहीच अडचण नव्हती. त्यांनी माहिराला ऑडिशन द्यायला सांगितलं. (फोटो- माहिरा खान/इन्स्टा)
-
मात्र, ‘हीरामंडी’ चित्रपटात काम करता आले नाही, असे माहिराचे म्हणणे आहे. कारण त्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तेढ निर्माण झाली होती. यानंतर ती ‘रईस’ चित्रपटासाठी भारतात आली. यामध्ये तिने शाहरुख खानबरोबर काम केलं होतं. (फोटो- माहिरा खान/इन्स्टा)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”