-
राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) दिग्दर्शित अत्यंत लोकप्रिय ‘पीके’ चित्रपटाला (PK Movie) आज १० वर्ष पूर्ण झाली. १९ डिसेंबर २०१४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
पीके ही व्यक्तिरेखा अशी होती, जी विनोदी होती पण सामाजिक टिप्पणी करणारीही होती.
-
त्यामुळे या व्यक्तिरेखेचा लूक अगदी आगळावेगळा असणे गरजेचे होते.
-
याविषयी आमिर खानशी (Aamir Khan) बोलताना आपण किती भांबावलो होतो याचे स्मरण करत दिग्दर्शक राजकुमार हिरानी म्हणतात…
-
“मी पहिल्यांदा आमिरकडे गेलो तेव्हा मी जरा चिंतेत होतो, की त्याची प्रतिक्रिया कशी असेल! पण, त्याने अजिबात प्रतिक्रिया दिली नाही. आणि मला समजले की आमिर ही भूमिका अगदी मनापासून करेल.”
-
हिरानी पुढे म्हणतात, “आम्ही शूटिंग करण्याअगोदरच आमिरने मला विचारले की, या एलियनचे शरीर कसे असेल? मला वाटते, त्याच्या शरीरावर केस नसले पाहिजेत. त्यामुळे मी वॅक्सिंग करून घेईन.” आणि प्रत्येक दृश्याच्या अगोदर तो वॅक्स करत असे.
-
‘पीके’मधल्या आमिर खानच्या पात्रात अनेक विचित्र गोष्टी होत्या. सगळ्यात ठळकपणे लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तो सतत पान चघळत असतो.
-
त्यामुळे पान खाऊन त्याचे ओठ सतत रंगलेले दिसतात.
-
या लूकबद्दल आमिर खान म्हणतो, “इतकी पानं खाऊन मी जाम वैतागलो होतो. एका दिवसात मला ६० ते १०० पानं खावी लागत होती.”
-
प्रत्येक टेकच्या आधी मला पान खावे लागत असे. शेवटी शेवटी तर मला तोंडात फोड येऊ लागले होते.
-
एखाद्या चित्रपटात, त्यातल्या नायकासाठी बनवलेला कोणताही कॉस्च्युम नसेल, असे जर कोणी सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल? होय, हे कितीही अशक्य, अविश्वसनीय वाटले, तरी आमच्या पीके म्हणजे आमीर खानच्या बाबतीत हेच झाले होते.
-
आमिर खान म्हणतो, “चित्रपटात खास माझ्यासाठी असे कोणतेही कॉस्च्युम डिझाईन करण्यात आले नव्हते”.
-
टीम राजस्थानला गेली. कोणत्याही स्थानिक व्यक्तीचा पोशाख आवडला, की तो त्याच्याकडून मागून विकत घेतला जात असे किंवा तसाच नवीन पोशाख घेतला जात असे.” असे केल्यामुळे चित्रपटातला पीके अगदी अस्सल वाटला.
-
‘पीके’ हा चित्रपट प्रेक्षकांना आज रात्री ८ वाजता सोनी मॅक्सवर पाहाता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया) हेही पाहा : अनुराग कश्यपच्या लेकीचे मालदीवमधील हनिमून फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर