-
‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने २०१९मध्ये व्यावसायिक विकी जैनला डेट करायला सुरू केलं आणि त्यानंतर १४ डिसेंबर २०२१मध्ये ती लग्नबंधनात अडकली. मुंबईत मोठ्या थाटामाटात अंकिता आणि विकीचा लग्नसोहळा पार पडला होता.
-
‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अंकिता लोखंडे आणि विकी जैन एकत्र खेळताना दिसले. बिग बॉसमुळे अंकिता, विकीसह अभिनेत्रीची सासू रंजना जैना आणि सुंदर जाऊबाई रेशू चर्चेत आली. पण, तुम्ही अंकिताच्या सुंदर नणंदेला कधी पाहिलंत का?
-
अंकिताची नणंद म्हणजेच विकी जैनच्या बहिणीचं नाव वर्षा जैन आहे.
-
वर्षाचं लग्न अभिषेक श्रीवास्तवबरोबर झालं आहे.
-
वर्षाचा जैनचा नवरा सीए (CA) आहे. तसंच त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे.
-
याशिवाय वर्षा जैनचा नवरा काही कपड्याच्या आणि ज्वेलरी कंपन्यांचा संस्थापक आहे.
-
वर्षा जैन आणि अभिषेक श्रीवास्तवला दोन मुलं आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
-
वर्षा जैन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी कुटुंबासह फोटो शेअर करत असते.
-
सर्व फोटो सौजन्य – वर्षा जैन आणि अभिषेक श्रीवास्तव इन्स्टाग्राम
मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं बेळगावमध्ये वाहकाला मारहाण; महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद