ी
-
सध्या टीव्ही जगतातील सीआयडी खूप चर्चेत आहे, सीआयडी ही भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या मालिकेपैकी एक आहे. आता या मालिकेचा दुसरा सीझन २१ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
-
पुन्हा एकदा इन्स्पेक्टर दया, अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न त्यांच्या टीमसह परतत आहेत. दरम्यान, अलीकडेच अभिनेता दयानंद शेट्टी आणि आदित्य श्रीवास्तव यांनी ‘सीआयडी’चा १११ मिनिटांचा एपिसोड एकाच शॉटमध्ये शूट करण्याचा अनुभव शेअर केला आहे. हा एपिसोड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे. दयानंद आणि आदित्य श्रीवास्तव यांनी एपिसोड कसा शूट केला गेला त्याबद्दल भाष्य केले आहे.
-
आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, ‘ आम्ही याबद्दल काहीही विचार केला नव्हता. आमच्याकडे ९० पानांची स्क्रिप्ट होती आणि आम्ही दररोज २० पानांची स्क्रिप्ट शूट करायचो. मग आम्ही ड्राय रन केले आणि तो २ तासांचा बनत होता पण तो 111 मिनिटांचा असायला पाहिजे होता, त्यामुळे एडिटनंते तो एपिसोड १ तास ५१ मिनिटांचा झाला होता.
-
बीपी सिंग यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा विचार कसा आला? याबाबत दोघांना विचारले असता ते म्हणाले, ‘सिंग सरांना नेहमीच सिंगल-शॉट एपिसोड शूट करायचे होते. त्यांच्या लोकप्रिय मराठी मालिका (१००) एक शून्य शून्य मध्ये एकच सिंगल शॉट एपिसोड होता आणि त्या मालिकेतही शिवाजी साटम नायक होते. त्यामुळे सीआयडीमध्येही एक तासाचा सिंगल शॉट एपिसोड शूट करावा, असे त्यांना वाटले. मग त्यांना कळले की ८८ मिनिटांच्या डॉक्युमेंट्री फिल्मचा एक विश्वविक्रम आहे, जो एकाच शॉटचा आहे. मग त्यांनी तो तोडण्याचा निर्णय घेतला आणि ९० मिनिटांचा एक भाग लिहायला सुरुवात केली. आणि मग स्क्रिप्ट १११ मिनिटांची झाली.
-
एपिसोड किती दिवसात शूट झाला?
याविषयी दयानंद शेट्टी आणि आदित्य श्रीवास्तव म्हणाले, ‘आम्ही १ ऑक्टोबरला लोणावळ्याला पोहोचलो आणि आम्ही सर्वांनी पहिली २० पाने शूट केली. आम्ही सर्वांनी डायलॉगची रिहर्सल केली आणि सीन कसे शूट केले जातील ते पाहिले. आम्ही हेच काम सलग पाच दिवस करत होतो. मग सहाव्या दिवशी आम्ही फक्त लोकेशन बघितलं आणि शूट कसं होईल ते ठरवलं. आम्ही सर्व कॅमेरा सेटअप, शॉटस कोरिओग्राफ केले आणि शूटसाठी सर्वकाही लॉक केले. -
नितीन राव यांनी ३७ किलो वजनाचा हेवी बॉडी कॅमेरा वापरून शूट केले.
त्यानंतर दयानंद शेट्टी आणि आदित्य यांनी सांगितले की या एपिसोडसाठी ३७ किलो वजनाचा वजनदार बॉडी कॅमेरा वापरण्यात आला होता, जो कॅमेरामन अंगावर घेऊन फिरत होता. नितीन राव असे या कॅमेरामनचे नाव आहे. या जड कॅमराने त्याने संपूर्ण एपिसोड एकाच शॉटमध्ये शूट केला. दयानंद आणि आदित्य यांनी सांगितले की, नितीनने ‘मैं हूं ना’ चित्रपटाचे गाणे एकाच शॉटमध्ये शूट केले होते. दोन तासानंतर नितीनची प्रकृती बिघडली. त्याचे संपूर्ण शरीर थरथरत होते, असेही त्यांनी सांगितले. -
वर्ल्ड रेकॉर्ड शूटमध्ये ही चूक झाली
एपिसोड शूट करताना काही चूक झाली का? याबाबत दयानंद शेट्टी आणि आदित्य श्रीवास्तव यांनी सांगितले की, अनेक चुका झाल्या. कधी-कधी तो त्याचा मोबाईलच शॉटमध्ये विसरायचा आणि तो एकच शॉट होता त्यामुळे कॅमेरा कटही होऊ शकत नव्हता. पण यावेळी एक मोठी चूक झाली, अशी माहिती दयाने दिली. -
त्याने ‘टेक्निकल चूका झाल्याचेही सांगितले, अभिनेता केके मेनन यांच्याबद्दलचा एक किस्सा त्यांनी शेअर केला आहे.
(सर्व फोटो सौजन्य- सोशल मीडिया)