-
जसजसे 2025 हे वर्ष जवळ येत आहे, तसतसे भारतीय चित्रपट उद्योग काही रोमांचक नवीन ऑन-स्क्रीन जोड्यांसाठी तयारी करत आहे. या वर्षी अशी अनेक जोडपी तयार होणार आहेत, ज्यांची कोणी कल्पनाही केली नसेल. पहिली जोडी म्हणजे कियारा अडवाणी आणि हृतिक रोशन. हे दोघेही अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर 2’ मध्ये दिसणार असून हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. (फोटो-पीआर)
-
अनुराग बसू दिग्दर्शित ‘मेट्रो इन दिनो’ मध्ये आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी आदित्य रॉय कपूर साराची मैत्रिण अभिनेत्री अनन्या पांडे हिला डेट करत होता. आता ती तिच्या बेस्टीच्या माजी प्रियकरसोबत एका चित्रपटात दिसणार आहे आणि हा चित्रपट येत्या वर्षभरात प्रदर्शित होणार आहे. (फोटो-पीआर)
-
गीतू मोहनदासच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटात कियारा अडवाणी आणि यश एकत्र दिसणार आहेत. या जोडीला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचा चित्रपट 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कियारा अडवाणी आणि यश व्यतिरिक्त, कलाकारांमध्ये नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि श्रुती हसन सारख्या कलाकारांचा समावेश आहे. (फोटो-पीआर)
-
रवीना टंडनची मुलगी राशा थडानी अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘आझाद’मधून पदार्पण करत आहे. अमन देवगणही तिच्याबरोबर आपली छाप सोडायला तयार आहे. हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. (फोटो-पीआर)
-
‘महाराज’ चित्रपटातून पदार्पण करणारा जुनैद खान आता खुशी कपूरसोबत दिसणार आहे. दोघेही ‘लव्ह, लाइक्स अँड एव्हरीथिंग इन बिटवीन’मध्ये एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि खुशीचे हे बॉलिवूडमधील पदार्पण असणार आहे. (फोटो-पीआर)
-
धनुष दिग्दर्शित ‘इडली कढाई’मध्ये धनुष आणि शालिनी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एका अनोख्या रेस्टॉरंटमध्ये घडलेली ही हृदयस्पर्शी कथा 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. (फोटो-पीआर)
-
संतोष सिंग दिग्दर्शित ‘आँखों की गुस्ताखियां’मध्ये विक्रांत मॅसी आणि शनाया कपूर एकत्र दिसणार आहेत. रस्किन बाँड पासून प्रेरित असलेला हा रोमँटिक ड्रामा 2025 मध्ये रिलीज होणार आहे. (फोटो-पीआर)
-
वरुण धवन आणि मृणाल ठाकूर हे डेव्हिड धवनच्या मनोरंजनपटात स्टार होण्यासाठी आणि हसवण्यासठी तयार आहेत, चित्रपटाचे नाव आणखीन गुलदस्त्यातच आहे. हा चित्रपट विनोदी चित्रपटप्रेमींसाठी खास मेजवाणी असणार आहे. (फोटो-पीआर)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”