-
‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळी पात्र घराघरांत लोकप्रिय झाली आहेत. सुभेदार कुटुंबीयांच्या घरात सायलीबरोबर सतत वावरणाऱ्या विमलची भूमिका अभिनेत्री मयुरी मोहिते साकारत आहे.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेत विमल संपूर्ण सुभेदार कुटुंबीयांची काळजी घेताना दिसते. घरातील मदतनीस असूनही सगळे कुटुंबीय तिच्याशी आपुलकीने वागत असतात.
-
साधी साडी, कपाळाला टिकली, गळ्याबरोबर लहानसं मंगळसूत्र असा लूक मालिकेत विमलचा असतो.
-
पण, खऱ्या आयुष्यात विमलची भूमिका साकारणारी मयुरी मात्र अतिशय ग्लॅमरस आहे.
-
मयुरीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये तसेच रंगभूमीवर सुद्धा काम केलेलं आहे.
-
मयुरीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यामुळे अनेक बालनाट्यांमध्ये देखील ती सहभागी झालेली आहे.
-
मयुरीने आजवर ‘मोलकरीणबाई’, ‘कन्यादान’, ‘डॉ डॉन’ अशा मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
-
याशिवाय अभिनेत्रीने काही जाहिरातींमध्ये तसेच ‘अनुराधा’ या वेबसीरिजमध्ये देखील काम केलंय.
-
आता सध्या मयुरीला ‘विमल’च्या रुपात घराघरांत लोकप्रियता मिळाली आहे. ( फोटो सौजन्य : मयुरी मोहिते इन्स्टाग्राम )

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य