-
Mismatched
‘मिसमॅच्ड’ ही एक हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा वेब सीरिज आहे. यात ऋषी आणि डिंपलची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. ऋषी पारंपरिक आहे, तर डिंपल एक गेमर आहे. दोघांमधला एक रंजक आणि भावनिक प्रवास या सीरिजच्या तिन्ही सीझनमध्ये पाहायला मिळतो. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट) -
ला पाल्मा
‘ला पाल्मा’ ही कुंब्रे व्हिएजा त्सुनामी धोक्याच्या सिद्धांतावर आणि २०२१ च्या कुंब्रे व्हिएजा ज्वालामुखीचा उद्रेक यावर आधारित नेटफ्लिक्सवरील मिनीसीरीज आहे. या सीरिजमध्ये नैसर्गिक आपत्ती आणि त्यांचे परिणाम दाखवण्यात आले आहेत. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट) -
Yeh Kaali Kaali Ankhein
‘ये काली काली आंखे’ ही एक भारतीय रोमँटिक क्राईम थ्रिलर वेब सीरिज आहे. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट) -
द ग्रेट इंडियन कपिल शो
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा एक हिंदी भाषेतील कॉमेडी आणि टॉक शो आहे जो कपिल शर्मा होस्ट करतो. हा शो महिनाभर जागतिक स्तरावर ट्रेंड करत आहे.
(फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट) -
Black Doves
‘ब्लॅक डोव्हज’ ही ब्रिटिश स्पाय थ्रिलर मालिका मैत्री आणि त्यागाची गोष्ट आहे. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट) -
1992
‘1992’ ही एक रहस्यमय थ्रिलर आणि 1992 च्या सेव्हिल एक्स्पोशी संबंध असलेल्या सिरीयल किलरबद्दलची ड्रामा सीरिज आहे. या शोमध्ये एक महिला पतीच्या मृत्यूनंतर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करते. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट) -
When the Phone Rings
‘व्हेन द फोन रिंग्ज’ ही साउथ कोरियन टेलिव्हिजन मालिका आहे. यात एका जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे, जे तीन वर्षे न बोलता संसार करत असतात. पण अपहरणकर्त्याच्या एका धमकीच्या कॉलनंतर त्यांचे आयुष्य बदलते. -
Khakee: The Bihar Chapter
‘खाकी: द बिहार चॅप्टर’ ही एक भारतीय क्राइम थ्रिलर वेब सिरीज आहे, जी बिहारमधील शेखुपुरा आणि पाटणा जिल्ह्यात घडते. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट) -
IC 814: कंदहार हायजॅक
‘IC 814: द कंदहार हायजॅक’ ही 1999 च्या कंदहार अपहरणावर आधारित एक भारतीय हिंदी क्राइम थ्रिलर सीरिज आहे. त्या धोकादायक घटनेच्या वेळी भारत सरकारने कोणती पावले उचलली हे या शोमध्ये दाखवण्यात आले आहे. (फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट) -
स्क्विड गेम
‘स्क्विड गेम’ हा साउथ कोरियन डिस्टोपियन सर्व्हायव्हल थ्रिलर आहे ज्यामध्ये 456 लोक त्यांच्या आर्थिक समस्यांना तोंड देण्यासाठी धोकादायक खेळांमध्ये सहभागी होतात.
(फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट)
डोनाल्ड ट्रम्प ९० दिवसांसाठी आयात शुल्कापासून दिलासा देणार? व्हाइट हाऊसचं स्पष्टीकरण…