-
Late Night with the Devil
हा एक सुपरनॅचरल भयपट आहे जो 1977 हॅलोविन रात्रीच्या लाइव्ह टॉक शो दरम्यान घडलेल्या घटनांवर आधारित आहे. शोचा होस्ट रेटिंग वाढवण्यासाठी एका कथितरित्या भुताटकी झालेल्या मुलीला बोलावतो. पण टीव्हीवर लाइव्ह असताना सर्वकाही नियंत्रणाबाहेर जाते आणि दर्शकांच्या घरापर्यंत घबराट पसरते. जर तुम्हालाही सुपरनॅचरल भयपटांची आवड असेल तर हा चित्रपट नक्की पहा. हा चित्रपट Lionsgate Play आणि Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. (Still From Film) -
Oddity
हा 2024 चा आयरिश हॉरर चित्रपट आहे जो एका अंध स्त्रीची आणि दुकानदाराची कथा सांगतो जी तिच्या जुळ्या बहिणीच्या हत्येचे गुढ उकलण्यासाठी विचित्र पद्धतींचा अवलंब करते. या चित्रपटात भीतीदायक क्षण तसेच प्रचंड भावनिकताही आहे, ज्यामुळे हा सिनेमा अधिक खास बनतो प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. (Still From Film) -
Infested
कोळ्यांच्या दहशतीला तोंड देण्याची हिंमत असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. इन्फेस्टेड हा एक फ्रेंच भयपट आहे ज्यामध्ये एक प्राणघातक विषारी कोळी एका अपार्टमेंटवर आक्रमण करतो आणि नंतर प्राण घेणाऱ्या कोळ्यांची संपूर्ण फौज तयार करतो. या चित्रपटात थरारक व भीतीदायक दृश्ये प्रचंड आहेत, जी तुमच्या रात्रीची झोप उडवून लावू शकतात. हा सिनेमाही प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. (Still From Film) -
In Flames
हा एक पाकिस्तानी-कॅनडियन सुपरनॅचरल भयपट आहे जो कराचीच्या एका स्लम भागात राहणाऱ्या आई-मुलीचे नाते दाखवतो. या चित्रपटात भूतकाळातील भुताटकीच्या घटनांशी लढणारी मुख्य पात्रे दाखवण्यात आली आहेत. हा चित्रपट केवळ भीतीच नाही तर संवेदनशीलता आणि सामाजिक विषमतेलाही स्पर्श करुन जातो. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. (Still From Film) -
Strange Darling
हा एक अमेरिकन थ्रिलरपट आहे, ज्यामध्ये एका रात्रीची ठरलेली भेट रक्तरंजीत रुपामध्ये बदलते. चित्रपटाची कथा एका रात्रीची आहे, एक पुरुष आणि एक महिला भेटायचं ठरवतात, हळू हळू कथा एका सिरीयल किलरच्या भीषणतेकडे वळते. हा थरारपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (Still From Film) -
Nosferatu
हा चित्रपट 1922 च्या क्लासिक हॉरर चित्रपट नोस्फेराटूची नवीन आवृत्ती आहे. यात काउंट ऑरलॉक या पात्राचा अधिक भयावह अभिनय दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट तुम्हाला गॉथिक व्हिज्युअल्ससह एका भयावह प्रवासात घेऊन जातो, खऱ्या भयपट प्रेमींसाठी एक उत्तम अनुभव देतो. हा चित्रपट 25 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
New Life
हा एक अमेरिकन हॉरर थ्रिलर आहे जो पॅसिफिक नॉर्थवेस्टमधील जंगलात एका पाठलाग अदृश्य शक्तीच्या गोष्टीने सुरु होतो. चित्रपटात पुढे स्वतःचा बचाव करण्यासाठी धावत असलेल्या एका महिलेला हे समजते की ती ज्या एजंटपासून स्वचःचा जीव वाचवायचा प्रयत्न करत आहे, त्याचाच पाठलाग कितीतरी जास्त भयानक शक्ती करत आहे. तुम्ही प्राइम व्हिडिओवर हा भयपट पाहू शकता. (Still From Film) -
MadS
हा एक सायकॉलॉजिकल हॉरर चित्रपट आहे ज्यामध्ये एका गूढ स्त्रीशी पुरुषाची भेट कशी भयानक परिणामाकडे जाते हे दाखवले गेले आहे. मन हेलावून टाकणारी ही कथा तुम्हाला थक्क करेन, हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. (Still From Film) -
Heretic
हा एक अमेरिकन हॉरर चित्रपट आहे ज्यामध्ये दोन तरुण धर्मप्रचारक एका अनोळखी व्यक्तीच्या घरी जातात आणि त्यांना कळते की ते एका भयानक व्यक्तीला भेटले आहेत. हा चित्रपट क्लॉस्ट्रोफोबिक (एंग्जायटी) ,संदर्भातील भयपट कथा सांगतो. हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. (Still From Film) -
Stopmotion
हा एक ब्रिटीश लाइव्ह-ॲक्शन आणि अॅडल्ट ॲनिमेटेड सायकोलॉजिकल थ्रिलर आहे ज्यामध्ये स्टॉप-मोशन ॲनिमेटर तिच्या स्वतःच्या निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये अडकल्यानंतर वेडेपणाच्या दिशेने जातो. एक विलक्षण अनुभव घेण्यासाठी हाही चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. (Still From Film)
हेही पाहा- गोविंदाचे ब्लॉकबस्टर ६ चित्रपट, आजही लोकप्रिय असलेल्या या सिनेमांनी ९० च्या दशकात किती कमाई केलेली? जाणून घ्या

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!