-
या यादीतील पहिला चित्रपट म्हणजे इम्तियाज अली दिग्दर्शित रॉकस्टार चित्रपट. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. दीपिकाला या चित्रपटात काम करायचे होते.
-
तिने एका मुलाखतीत याबद्दल उल्लेख केला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. मात्र, निर्मात्यांनी या चित्रपटातील भूमिकेसाठी नर्गिस फाखरीची निवड केली होती.
-
या यादीतील दुसरा चित्रपट म्हणजे शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांचा जब तक है जान. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटातील कतरिनाची भूमिका दीपिकाला ऑफर करण्यात आली होती.
-
मात्र तारखांमुळे ही भूमिका नंतर कतरिनाला देण्यात आली.
-
सलमान खान आणि सोनम कपूरचा प्रेम रतन धन पायो हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. मात्र, तारखांमुळे दीपिका हा चित्रपट करू शकली नाही आणि नंतर ही भूमिका सोनमला देण्यात आली.
-
अनुष्का शर्मा आणि सलमान खान स्टारर ‘सुलतान’ हा चित्रपटही खूप गाजला होता. या चित्रपटासाठी दीपिका पदुकोण पहिली पसंती होती. मात्र नंतर ही भूमिका अनुष्का शर्माकडे गेली.
-
या यादीतील शेवटचा चित्रपट म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी. या चित्रपटात आलिया भट्ट दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट दीपिका पदुकोणला ऑफर करण्यात आला होता, पण तिने तो नाकारला होता.
-
त्यानंतर आलिया भट्टला ही भूमिका मिळाली. या चित्रपटासाठी आलिया भट्टला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल