-
तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा यावर्षी २६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला.
-
अभिनेत्रीचं सासर हे नाशिकला आहे. कारण तितीक्षा मूळची कोकणातली असून सिद्धार्थ हा नाशिकचा आहे.
-
अभिनेता सिद्धार्थ बोडकेच्या आई-बाबांनी नाशिकमध्ये सुंदर असं घर खरेदी केलं आहे. तितीक्षा सासरच्या मंडळींसह दिवाळीच्या मुहूर्तावर या आलिशान घरात शिफ्ट झाली.
-
तितीक्षाने युट्यूब व्हिडीओ शेअर करत तिच्या सासरच्या घराची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे.
-
घरात एन्ट्री घेतल्यावर प्रशस्त हॉल आणि त्याला लागून असलेली मोठी बाल्कनी सर्वांचं लक्ष वेधून घेते.
-
याशिवाय तितीक्षा-सिद्धार्थच्या या नव्या घरातून सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो. या गॅलरीतून गोदावरी नदी व संपूर्ण नाशिक शहराचा व्ह्यू पाहायला मिळतो असं अभिनेत्रीने तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये सांगितलं.
-
सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोडके कुटुंबीयांनी घराच्या दारावर आकर्षक नेमप्लेट लावली आहे.
-
बोडके असं आडनाव मोठ्या अक्षरात लिहून त्याखालोखाल संदीप ( अभिनेत्रीचे सासरे), पल्लवी ( अभिनेत्रीची सासू ), सिद्धार्थ तितीक्षा अशी नावं लिहिलेली नेमप्लेट त्यांनी नव्या घराच्या दाराबाहेर लावली आहे. या सुंदर नेमप्लेटचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
-
तितीक्षा व सिद्धार्थ यांनी या सुंदर घराचं श्रेय त्यांच्या आई-बाबांना ( तितीक्षाचे सासू-सासरे) दिलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे इन्स्टाग्राम व युट्यूब व्हिडीओ )
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य