-
अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर केळवणाचे फोटो शेअर केले आहेत.
-
शिवानीने या फोटोंना ‘घरचं केळवण/लाड’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
शिवानीच्या केळवणासाठी तिच्या कुटुंबीयांनी खास तयारी केली होती.
-
आकर्षक अशी फुलांची सजावट, ताटाभोवती रांगोळी काढून शिवानीचं केळवण करण्यात आलं.
-
अभिनेत्रीसाठी खास नॉन व्हेज जेवणाचा बेत करण्यात आला होता. फिश फ्राय, कोलंबी मसाला, भात-भाकरी, सोलकढी असं चविष्ट जेवण शिवानीसाठी बनवण्यात आलं होतं. याशिवाय काही गोडाचे पदार्थही आजूबाजूला ठेवण्यात आले होते.
-
शिवानी सोनारचा होणारा नवरा सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचं नाव आहे अंबर गणपुळे. त्याने ‘रंग माझा वेगळा’, ‘दुर्वा’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.
-
शिवानी सोनार आणि अंबरचा साखरपुडा एप्रिल महिन्यात पार पडला होता.
-
आता केळवणाला सुरुवात झाल्याने लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
दरम्यान, शिवानी सोनारबद्दल सांगायचं झालं, तर ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. ( सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार इन्स्टाग्राम )
य